दिल्लीतील प्रेम नगर परिसरात घराला लागलेल्या आगीत ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. File photo
राष्ट्रीय

Delhi Fire |घराला आग लागून एकाच कुटुंबातील ४ जणांचा होरपळून मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

दिल्लीतील प्रेम नगर परिसरात एका घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही आग मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास लागली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत गंभीर जखमी झालेल्या ४ जणांना रुग्णालयात दाखल केले होते. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती दिल्ली अग्निशमन सेवा विभागाने दिली आहे.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, नजफगढच्या प्रेम नगर परिसरात मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत दाम्पत्यासह कुटुंबातील ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. कुटुंबातील सदस्य पहिल्या मजल्यावर झोपले होते. यादरम्यान इन्व्हर्टरमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बेशुद्ध झालेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे चौघांना मृत घोषित करण्यात आले. हिरा सिंह, त्यांची पत्नी नीतू सिंह, मुलगा रॉबिन आणि लक्ष्य अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नजफगढच्या प्रेम नगर कॉलनीमध्ये ही घटना घडली. ज्यामध्ये पती- पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. पहाटे साडेतीनच्या सुमारास घराला आग लागली. त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे कारण समोर आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT