पुढारी ऑनलाईन डेस्क
सेबीच्या माजी प्रमूख माधवी बूच - पूरी यांच्यावर शेअर बाजारातील घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. प्रकरणी विशेष न्यायालयाने एन्टी करप्शन ब्युरोला माधवी बूच पुरी व अन्य अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
विशेष एसीबी न्यायालयाचे न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी शनिवारी हे आदेश पारित केले आहेत. प्रथमदर्शनी मिळालेल्या पुराव्यानुसार संगनमताने घोटाळा झाल्याचे निर्दशनास आले आहे. याची निपःक्ष पणे चौकशी होणे गरजेचे असून ३० दिवसांत याचा अहवाल द्यावा लागेल असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
या संदर्भात केलेल्या याचिकाकर्त्यांने विविध आरोप केले आहेत. मोठ्या प्रमाणात पैशांची अफरातफर झाली असून सेबीच्या नियमांचे उल्लंघन करुन व्यवहार झाले आहेत. सेबीचे माजी अध्यक्षांनी कर्तव्यात कसूर केली आहे त्यामुळे बाजारात हेराफेरी करण्यासाठी चालना मिळाली. त्याचबरोबर नियमात न बसणाऱ्या कंपन्याना शेअर बाजारात लिस्टेड करण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यामुळे कार्पोरेट फसवणूक झाली असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणने आहे.