रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास.  File Photo
राष्ट्रीय

माजी RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधानांच्या प्रधान सचिव-२ पदी नियुक्ती

Shaktikanta Das : मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीची मान्‍यता

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das)
यांची शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्‍य सचिव-२ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गुजरात कॅडरचे निवृत्त आयएएस अधिकारी पीके मिश्रा सध्या पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून काम पाहत आहेत.

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने शक्तिकांत दास यांची पंतप्रधानांचे प्रधान सचिव-२ म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. त्यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून ही नियुक्‍ती लागू होईल. त्यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या कार्यकाळात किंवा पुढील आदेशापर्यंत असेल," असे आदेशात म्हटले आहे.

शक्तिकांत दास यांनी ४२ वर्षांहून अधिक काळ वित्त, कर आकारणी, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रात उल्लेखनीय सेवा दिली आहे. रिझर्व्ह बँकेचे २५ वे गव्हर्नर यांनी भारताचे जी-२० शेर्पा आणि १५ व्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणूनही काम केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT