Digital Arrest Scam | माजी न्यायाधीशालाच डिजिटल अरेस्टद्वारे अडीच कोटींचा गंडा! Pudhari File Photo
राष्ट्रीय

Digital Arrest Scam | माजी न्यायाधीशालाच डिजिटल अरेस्टद्वारे अडीच कोटींचा गंडा!

पुढारी वृत्तसेवा

जयपूर; वृत्तसंस्था : आपण सीबीआय आणि रिझर्व्ह बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून सायबर भामट्यांनी चक्क सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीशाला सुमारे १५ दिवस ‘डिजिटल अरेस्ट’ करून २.५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

गणपत सिंह भंडारी असे नव्वद वर्षीय माजी न्यायाधीशांचे नाव आहे. सायबर भामट्यांनी धमकी दिल्यानंतर न्यायाधीशांनी भीतीपोटी ३ ते १० ऑगस्टदरम्यान बँक खात्यातून २ कोटी ५० लाख ५१ हजार रुपये ट्रान्‍स्फ‍र केले. सायबर भामट्यांनी न्या. भंडारी यांना व्हॉटस्‌ॲपवर व्हिडीओ कॉल करून, हवाला व्यवहारात नाव असल्याचे सांगून अटकेची भीती दाखवली. एवढेच नव्हे, तर त्यांना दररोजचे चॅटस्‌ आणि कॉल रेकॉर्ड डिलिट करण्यास सांगून कुटुंबापासून सर्व माहिती लपवण्यास भाग पाडले.

न्या. भंडारी यांना ठगांनी पीपीएफ खात्यातून पैसे काढण्यास सांगितले, तेव्हा बँक मॅनेजरला संशय आला. त्याने हा सायबर फ्रॉड असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर भंडारी यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. सायबर भामट्यांचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT