माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते चंपाई सोरेन  File photo
राष्ट्रीय

अखेर चंपाई सोरेन यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला!

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अखेर झारखंचे माजी मुख्‍यमंत्री चंपाई सोरेन यांनी आपण भाजपमध्‍ये प्रवेश करणार असल्‍याचे आज जाहीर केले. शुक्रवार, ३० ऑगस्‍ट रोजी भाजपमध्‍ये प्रवेश करणार असल्‍याचे त्‍यांनी ANIशी बोलताना जाहीर केले.

चंपाई सोरेन यांनी म्‍हटलं आहे की, मी ३० ऑगस्‍ट रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे. हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. पक्षाकडून दिली जाणारी भूमिका मला मान्‍य असेल. झारखंडच्या जनतेच्या विकासासाठी आम्ही पावले उचलू. या राज्याचा विकास करण्यासाठी आणि आदिवासींचे अस्तित्वाच्‍या लढाईसाठी मी भाजपमध्‍ये प्रवेश करणार आहे.

नवी पक्ष स्‍थापन करणार असल्‍याचीही केली होती घोषणा

"मी राजकारणातून निवृत्त होणार नाही. मी सुरू केलेल्या नवीन अध्यायात आता नवीन पक्ष स्‍थापन करणार आहे. मला चांगला राजकीय मित्र गवसल्‍यास पुढे जाईन. त्या मैत्रीने जनतेची आणि राज्याची सेवा करायची आहे. . मी निवृत्ती, नवीन पक्ष किंवा मित्र असे तीन पर्याय मी दिले होते. मी निवृत्त होणार नाही. मी नवा पक्ष स्‍थापन करेन, अशी घोषणा २१ ऑगस्‍ट रोजी चंपाई सोरेन यांनी स्‍पष्‍ट केली होती. तसेच आठवडाभरात सर्व काही स्पष्ट होईल, असेही त्‍यांनी सांगितले होते. त्‍यानुसार आता नवीन पक्ष स्‍थापन करण्‍याऐवजी त्‍यांनी भाजपमध्‍ये प्रवेश करणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे.

'स्वाभिमाना'ला धक्का बसल्‍याने दिला होता राजीनामा

चंपाई सोरेन यांनी X वरील पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं होते की, हेमंत सोरेन यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर मला राजीनामा देण्‍यास सांगण्‍यात आले. हा माझा स्वाभिमानाचा धक्का होता. हेमंत सोरेन तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आमदार आणि इतर आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीचा अजेंडा आपल्याला माहिती नसल्याचा दावाही त्‍यांनी केला. मला कोणताही लोभ नव्हता. त्यामुळे मी ताबडतोब राजीनामा दिला, पण माझ्या स्वाभिमानाला धक्का लागल्याने माझे मन भावूक झाले होते, असेही त्‍यांनी आपल्‍या पाेस्‍टमध्‍ये नमूद केले हाेते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT