अहमदाबाद (गुजरात) : अहमदाबादजवळील मेघानी भागात गुरुवारी (दि. १२) एअर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन झाले. या विमानाने २४२ प्रवाशी प्रवास करत होते. २०४ प्रवाशांचे मृतदेह घटनास्थळी मिळून आल्याची माहिती समोर आली आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे संपूर्ण देश हादरवून गेला आहे. या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे प्रवास करत होते. त्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला असल्याची माहिती गुजरात भाजप अध्यक्ष सीआर पाटील यांनी दिली. रूपाणी यांचे कुटुंबीय लंडनला असून ते आपली पत्नी व मुलीला भेटायला लंडनला या विमानाने निघाले होते. दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. हे विमान विसतीगृहाच्या इमारतीवर आदळल्याने या दुर्घटनेत वसतीगृहातील काही मुलांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तविण्यात आली आहे.
अहमदाबाद एअरपोर्टवरून गुरूवारी (दि.१२) एअर इंडियाचे फ्लाइट AI171 हे विमान लंडनला निघाले होते. अहमदाबादजवळील मेघानी भागात इमारतीवर हे विमान आदळल्याने मोठा स्फोट होऊन ही दुर्घटना घडली. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान मेघानी भागात क्रॅश झाले. या विमानातून २४२ प्रवाशांसह गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही प्रवास करत होते. ते त्यांच्या पत्नीला व मुलीला भेटायला लंडनला निघाले होते. यादरम्यान ही दुर्घटना घडून २०० पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तविण्यात आली आहे. विमान दुर्घटना झालेल्या ठिकाणी २०४ प्रवाशांचे मृतदेह आढळून आले असून आणखी प्रवाशांचे शोधकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाल्याची माहिती गुजरात भाजप अध्यक्ष सीआर पाटील यांनी माध्यमांना दिली.