माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नवे निवासस्थान मंडी हाऊसजवळील फिरोज शाह रस्त्यावर असेल. file photo
राष्ट्रीय

अरविंद केजरीवाल दोन दिवसांत मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार

Arvind Kejriwal | नवा पत्ता मंडी हाऊस परिसरात

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार केजरीवाल येत्या दोन दिवसांमध्ये सिव्हील लाईनमधील मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार आहेत. त्यांचे नवे निवासस्थान नवी दिल्लीतील मंडी हाऊसजवळील फिरोज शाह रस्त्यावर असेल.

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यासाठी निवासस्थान निश्चित करण्यात आले आहे. मंडी हाऊसजवळील फिरोज शाह रस्त्यावरील 'आप'च्या राज्यसभा खासदारांना दिलेल्या दोन सरकारी बंगल्यांपैकी एका बंगल्यात केजरीवाल राहू शकतात, अशी माहिती आम आदमी पक्षातील सूत्रांनी दिली. फिरोज शाह रस्त्यावर बंगला क्रमांक ५ आणि १० आम आदमी पक्षाच्या दोन राज्यसभा खासदारांना देण्यात आले आहेत. यापैकी ५ क्रमांकाचा बंगला राज्यसभा खासदार अशोक मित्तल आणि १० क्रमांकाचा बंगला राज्यसभा खासदार एन. डी. गुप्ता यांचा आहे. हे दोन्ही बंगले रविशंकर शुक्ला लेनवर असलेल्या आम आदमी पार्टीच्या मुख्यालयापासून अवघ्या काही मीटर अंतरावर आहेत.

दरम्यान, ‘आप’ने केजरीवाल यांना राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख म्हणून अधिकृत निवासस्थान देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. मात्र, त्यावर काही निर्णय झालेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT