UPSC Chairman Appointed
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) अध्यक्षपदी माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. . या अध्यादेशानुसार श्री कुमार यांच्या नियुक्तीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. २९ एप्रिल रोजी प्रीती सुदान यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) अध्यक्षपद रिक्त झाले होते.
केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या आदेशानुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अजय कुमार यांच्या केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) अध्यक्षपदी नियुक्तीला मान्यता दिली आहे. १९८५ च्या बॅचचे केरळ केडरचे आयएएस अजय कुमार हे २३ ऑगस्ट २०१९ ते ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत संरक्षण सचिव होते.
आयएएस, भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) आणि भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) यासह इतर पदांसाठी केंद्रीय लोकसवा आयोग परीक्षा घेतले. या आयोगावर एक अध्यक्ष आणि जास्तीत जास्त १० सदस्य असतात. सध्या आयोगात सध्या आयोगात दोन सदस्यांची जागा रिक्त आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) अध्यक्षाची नियुक्ती सहा वर्षांच्या कालावधीसाठी किंवा वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत केली जाते. अजय कुमार हे केरळ केरडचे १९८५ च्या बॅचचे(आयएएस) अधिकारी आहे. त्यांनी २३ ऑगस्ट २०१९ ते ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत संरक्षण सचिवपदी काम केले.