राष्ट्रीय

वैज्ञानिक डॉ. श्रीकुमार बॅनर्जी यांचं निधन

Pudhari News

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अणू ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि वैज्ञानिक डॉ. श्रीकुमार बॅनर्जी यांचं काल मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. बॅनर्जी यांनी भाभा अणू संशोधन केंद्राच्या संचालकपदाची जबाबदारीही सांभाळली होती.

भौतिक धातू आणि धातू विज्ञान क्षेत्रात त्यांनी मोलाचं योगदान दिलं होतं. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. बॅनर्जी यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.

बॅनर्जी यांनी भारताच्या विज्ञान जगतात दिलेलं योगदानाचं कायम स्मरण केलं जाईल असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT