PM Narendra Modi  x
राष्ट्रीय

PM Narendra Modi : सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला विरोध करणाऱ्या शक्ती सक्रिय : पंतप्रधान नरेंद्र मोदी

तुष्टीकरण करणाऱ्यांचे कट्टरपंथीयांसमोर लोटांगण

पुढारी वृत्तसेवा

अहमदाबाद : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला विरोध करणाऱ्या शक्ती आजही सक्रिय आहेत. तुष्टीकरण करणाऱ्यांचे कट्टरपंथीयांसमोर लोटांगण सुरू आहे. त्यामुळे त्यांचा पराभव करण्यासाठी देशाने सतर्क, संघटित आणि शक्तिशाली राहणे आवश्यक आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

1026 मध्ये महमूद गझनीने सोमनाथ मंदिरावर केलेल्या पहिल्या आक्रमणाला 1,000 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सोमनाथ स्वाभिमान पर्वमध्ये पंतप्रधान बोलत होते.

याप्रसंगी मोदी म्हणाले, सोमनाथचा इतिहास हा विनाश आणि पराभवाचा नसून विजय आणि नूतनीकरणाचा आहे. कट्टरपंथी आक्रमक आता इतिहासाच्या पानांपुरते मर्यादित राहिले आहेत; परंतु सोमनाथ मंदिर आजही ताठ मानेने उभे आहे. द्वेष, अत्याचार आणि दहशतीचा खरा इतिहास आपल्यापासून लपवून ठेवला गेला आणि हे आक्रमण केवळ मंदिर लुटण्याचा प्रयत्न होता, असे आपल्याला शिकवले गेले, असे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.

तत्पूर्वी, मोदी यांनी रविवारी गुजरातच्या सोमनाथ मंदिरात शौर्य यात्रा काढली. यात्रेदरम्यान त्यांनी मंदिराच्या संघर्षाच्या इतिहासाचा उल्लेख करत एक मजबूत राजकीय आणि सांस्कृतिक संदेश दिला. दि. 11 जानेवारी रोजी निघालेल्या या शौर्य यात्रेत 108 घोडे सामील झाले होते, जे शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक होते. ही यात्रा शतकानुशतके परकीय आक्रमणांपासून मंदिराचे रक्षण करताना प्राण अर्पण करणाऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT