अन्न सुरक्षा योजना | लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य  File Photo
राष्ट्रीय

अन्न सुरक्षा योजना | लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य

E-KYC : 'ही' आहे शेवटची तारीख

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : जर तुम्ही शिधापत्रिकाधारक असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची बाब आहे. भारत सरकारकडून शिधापत्रिकाधारकांना दर महिन्याला रेशनचे वाटप केले जाते. यासोबतच कार्डधारकांना शिधापत्रिकेद्वारे इतर लाभही मिळतात.  राष्ट्रीय अन्न आणि रसद विभागाने रेशन कार्ड ई-केवायसीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी लवकरात लवकर ई-केवायसी करणे आवश्यक आहे. जाणून घेवूया  ई-केवायसीची (E-KYC)अंतिम तारीख काय आहे.

E-KYC : ही' आहे शेवटची तारीख

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत निवडलेल्या सर्व लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. ई-केवायसीची अंतिम तारीख ही १४  ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.  ई-केवायसीसाठी कुटुंबातील सर्व सदस्यांची बायोमेट्रिक पडताळणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना जवळच्या रास्त भाव दुकानात जाऊन मागिती घेवून पडताळणी करून घ्यावी लागेल.

ई-केवायसी मोफत? 

राज्यात कोणत्याही ठिकाणी असलेल्या रास्त भाव दुकानात ई-केवायसी करता येते. जर कोणत्याही सदस्याचे आधार कार्ड ग्राहकांच्या शिधापत्रिकेशी लिंक केलेले नसेल, तर त्या सदस्याचे ई-केवायसी शिधापत्रिकेत आधार जोडल्यानंतरच करता येईल. ई-केवायसीचे काम पूर्णपणे मोफत आहे. ई-केवायसी दरम्यान कोणत्याही ग्राहकाच्या बोटांचे ठसे स्कॅन केले नसल्यास, आयरिस मशीनद्वारे त्यांच्यासाठी ई-केवायसी केले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT