अलिबाग तालुक्यातील आक्षी येथे मराठी भाषेचा पहिला शिलालेख. या परिसराचे आता सुशोभीकरण करण्यात आले आहे. Pudhari File Photo
राष्ट्रीय

मराठी भाषेचा अलिबागच्या आक्षीतील पहिला शिलालेख

अमृतातही पैजा जिंकणार्‍या मराठीच्या समृद्धीत भर; प्रशासनाकडून परिसराचे सुशोभीकरणही

पुढारी वृत्तसेवा
अतुल गुळवणी

अलिबाग : ‘माझ्या मराठीचा बोलू कवतुके, परि अमृतातहि पैजा जिंके’ असे यथार्थ वर्णन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींनी करत मराठी भाषेची समृद्धी वाढविली आहे. याच समृद्धीचे अनेक पुरावे पुरातन काळापासून सापडत आलेले आहेत. त्यातील एक म्हणजे अलिबाग तालुक्यातील आक्षी येथील मराठी शिलालेख. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या शिलालेखाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या सुशोभीकरणामुळे मराठी भाषेवर निस्सिम प्रेम करणारा मराठी माणूस या शिलालेखासमोर नतमस्तक होत आहे.

निसर्गाचे वरदान लाभलेल्या अलिबाग तालुक्याला जशी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. तसा पौराणिक पार्श्वभूमीचा वारसादेखील लाभलेला आहे. आक्षी गाव अलिबागच्या दक्षिणेस सुमारे 5 किमी अंतरावर आहे. हे गाव अरेका आणि नारळाच्या हिरव्यागार बागांनी वेढलेले आहे. आक्षी हे अलिबाग मुरुड रस्त्यावर वसलेले आहे. आक्षीला एक मोठा ऐतिहासिक वारसा आहे. गावाच्या प्रवेशद्वाराजवळील प्राचीन स्तंभ गावाच्या ऐतिहासिकतेची पुष्टी करतो. या परिसरात कोकण शिलाहार राजवंश नृपती केशीदेवराय आणि देवगिरी यादव नृपती रामचंद्रदेव पांचे असे दोन शिलालेख सापडले आहेत.

सुशोभीकरणासाठी तीन लाखांचा निधी

आक्षीतील मराठीतील आद्य शिलालेख जतनासाठी रायगड जिल्हा परिषद पुढे आली आहे. यासाठी जिल्हा परिषदेने 3 लाखांच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. तत्कालीन जि.प. अर्थ व बांधकाम सभापती नीलिमा पाटील, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला.

शके 934 सालातील शिलालेख

हा शिलालेख केशीदेवरायांचा आहे. देवनागरी लिपीत संस्कृत आणि मराठीच्या मिश्रणात लिहिलेला आहे. तो शक काळातील 934 साल, प्रभावी संवत्सर अतिरिक्त महिना (ज्येष्ठ), शुक्रवार, 16 मे, इ.स. 1012 च्या अनुषंगाने आहे. या शिलालेखात कोकण शिलाहार राजवंशाचा राजा केशीदेवराय, महाप्रधान भैरजू सेनूई आणि कोरलेली व्यक्ती लुणय यांची नावे आहेत. शिलालेखाच्या वरच्या भागात चंद्र आणि सूर्याच्या प्रतिमा आहेत. त्यानंतर संस्कृत आणि मराठीच्या मिश्र स्वरूपात एकूण 9 ओळी आहेत. शिलालेखाचा सारांश दर्शवितों की कोकणचा राजा चक्रवर्ती केशीदेवराय यांनी महाप्रधान भैरजू सेनूई यांनी नोंदवल्याप्रमाणे गावातील देवी दान्यादेवीला धान्याच्मा नक कवालमा (मापनाचे एकक) दान केल्या होत्या. पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या मते, मराठी भाषेत उपलब्ध असलेला हा पहिला शिलालेख आहे.

शिलालेख संस्कृत-मराठी मिश्र भाषेत

यादव नृपती रामचंद्रदेव पांचा शिलालेख संस्कृत-मराठी मिश्र भाषेत असून तो देवनागरी लिपीत आहे. शिलालेखात यादव नृपती, जयदेव-मादव नृपतीचे मांडलिक आणि ईश्वरदेव क्षत्रिय जगदेव यांचा मुलगा अशी नावे आहेत. दोन्ही शिलालेखांवर चंद्र आणि सूर्याच्या प्रतिमा आहेत. गड्डेगलमध्ये स्थानिकांसाठी शासकांनी घालून दिलेल्या जमिनीबाबतचे नियम आणि कायदे दिले आहेत. गड्ढेगलात हा एक शिलालेख आहे. यात सूर्य आणि चंद्रसारखे विशिष्ट शुभ गुण आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT