पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याचा मित्र प्रगत सिंग याच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी रात्री मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी प्रगत सिंगच्या घरावर गोळीबार करुन पलायन केले.
प्रगत सिंग याला एक निवावी फोन आला. त्याने ताे फोन कट केला. त्यानंतर त्याच्या फाेनवर एक मेसेज आला. यामध्ये ३० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. खंडणी देणार नसला तर एक बंदुकधारी सुरक्षा रक्षक नेमा तसेच बुलेटप्रूफ गाडी घ्या, अशी धमकीही या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. गोळीबाराची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पंजाबमधील मानसा जिल्ह्यात 29 मे 2022 रोजी पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मुसेवाला हत्याकांड प्रकरणी २६ ऑगस्ट २०२२ रोजी पोलिसांना १ हजार ८५० पानांचो दोषारोपपत्र दाखल केले होते.
सिद्धू मुसेवाला यांच्या खुनाची सुपारी कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी बरार ( Goldy Brar ) याने घेतली होती. बिश्नोई यानेच तुरुगांतून मुसेवाला यांच्या खुनाची सुपारी दिली असल्याची कबुली गोल्डी याने दिली होते. बिश्नोईचे दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश अशा विविध राज्यांत गुन्हेगारीचे जाळे पसरले आहे. बिश्नोई आधी विद्यार्थी चळवळीत कार्यरत होता नंतर त्याने वाहने चोरी सारखे गुन्हे सुरू केले. बिश्नोईच्या गँगमध्ये ७०० च्यावर गुंड आहेत. या टाेळीने वारंवार अभिनेता सलमान खान याला ठार मारु अशी, जाहीर धमकी दिली आहे. राजस्थानमधील गँगस्टर आनंदपाल सिंग पोलीस कारवाईत मारला गेला, त्यानंतर सिंग याच्या टोळीतील अनेक गुंड बिश्नोई टोळीत सामील झाले होते.