NEET Question Paper Leak | ‘नीट’चे प्रश्‍न फोडण्‍यासाठी ‘फिफा वर्ल्‍डकप’ नावाचा वापर! 
राष्ट्रीय

NEET Question Paper Leak | ‘नीट’चे प्रश्‍न फोडण्‍यासाठी ‘फिफा वर्ल्‍डकप’ नावाचा वापर!

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्‍था : देशभरात गदारोळ निर्माण करणार्‍या ‘नीट-यूजी २०२६’ पेपरफुटीच्‍या प्रकरणात केंद्रीय गुन्‍हे अन्‍वेषण (सीबीआय) विभागाच्‍या आरोपपत्रातून धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. राष्‍ट्रीय परीक्षा संस्‍थेचा (एनटीए) रसायनशास्‍त्र तज्‍ज्ञ पी. व्‍ही. कुलकर्णी यानेच पेपरफुटीत सर्वात मोठी भूमिका पार पाडल्‍याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे. पेपरफुटीची तयारी ६ महिने आधी ऑक्‍टोबर २०२५ पासूनच सुरू होती. विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्‍न पोहोचविण्‍यासाठी ‘स्‍पेशल क्‍लास’, ‘फिफा वर्ल्‍डकप’ अशा विशेष नावांचे खास व्‍हाॅटस्‌ॲप ग्रुप बनविण्‍यात आले होते. या प्रश्‍नांच्‍या बदल्‍यात रोख रकमेसोबतच घड्याळही भेट म्‍हणून घेण्‍यात आले, असे उल्‍लेख सीबीआयने आरोपपत्रात केल्‍याची माहिती पुढे आली आहे.

‘स्पेशल क्लास’

कुलकर्णीने २५ एप्रिलला ‘स्पेशल क्लास’ नावाने व्हॉटस्‌ॲप ग्रुप बनवला. यात विद्यार्थ्यांची नावे, त्यांच्याकडून घेतलेल्या रकमेची नोंदही आढळली. पैसे थेट कुलकर्णी किंवा मनीषा वाघमारे यांच्यामार्फत घेण्यात आले. कुलकर्णीने भौतिकशास्त्राचा पेपर मिळवण्याचाही प्रयत्न केला होता.

जीवशास्‍त्राचे ८० ते ९३ टक्‍के, रसायनचे १०० टक्‍के प्रश्‍न जुळले

सीबीआयनुसार, दिल्ली विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी लीक झालेले दस्तऐवज आणि मूळ प्रश्नपत्रिकांची तपासणी केली. जीवशास्‍त्राच्या अनेक संचांमध्ये ८० ते ९३ टक्के प्रश्न एकसारखे आढळले. रसायनशास्‍त्रात अनेक मास्टर सेटमधील ४५ पैकी ४५ प्रश्न तंतोतंत जुळले. एका आरोपीच्या मोबाईलमधून मिळालेल्या रसायनशास्‍त्राच्‍या १३२ हस्तलिखित प्रश्नांपैकी १११ प्रश्न ‘एनटीए’च्या अधिकृत प्रश्नपत्रिकेशी पूर्णपणे जुळणारे आढळले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT