अरुणाचलमध्ये भीषण अपघात; 3 लष्करी जवान ठार  File Photo
राष्ट्रीय

अरुणाचलमध्ये भीषण अपघात; लष्कराचे ३ जवान शहीद, ४ जखमी

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : अरुणाचल प्रदेशमध्ये ट्रक रस्त्यावरून घसरून खोल दरीत पडल्याने लष्कराच्या तीन जवानांचा मृत्यू. तर चारजण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. जखमींवर उपचार सुरु आहेत.

३ जवान शहीद, ४ जखमी

अरुणाचल प्रदेशातील अप्पर सुबनसिरी जिल्ह्यात लष्कराचा ट्रक रस्त्यावरून घसरून खोल दरीत पडल्याने लष्कराच्या तीन जवानांचा मृत्यू झाला. तर तर चारजण जखमी झाले आहेत. असे पोलिसांनी सांगितले. हा अपघात तापी गावाजवळ मंगळवारी (दि.२७) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झाला. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हवालदार नखत सिंग, नाईक मुकेश कुमार आणि ग्रेनेडियर आशिष कुमार अशी मृतांची नावे आहेत.

कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान

या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना लष्कराच्या पूर्व कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल आरसी तिवारी म्हणाले, "हवालदार नखत सिंग, एनके मुकेश कुमार आणि जीडीआर आशिष यांच्या दुःखद निधनाबद्दल मी तीव्र शोक व्यक्त करतो. कर्तव्य बजावताना त्‍यांनी सर्वोच्च बलिदान दिले. भारतीय लष्कर शोकाकुल कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT