FASTag annual pass 2025  pudhari photo
राष्ट्रीय

FASTag annual pass 2025 : फक्त ३ हजारमध्ये वर्षभर टोल फ्री प्रवास! गडकरींची घोषणा, जाणून घ्या कसा काढायचा नवीन FASTag पास

Nitin Gadkari | १५ ऑगस्ट २०२५ पासून खासगी वाहनांसाठी केंद्र सरकारकडून नवीन FASTag वार्षिक पास सुरू होणार आहे. फक्त 3,000 मध्ये वर्षभर किंवा २०० ट्रिप्सपर्यंत टोल फ्री प्रवास करता येणार आहे. जाणून घ्या कसा काढायचा पास.

मोहन कारंडे

FASTag annual pass 2025 |

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी FASTag आधारित वार्षिक पासची घोषणा केली आहे. या नव्या योजनेअंतर्गत फक्त ३ हजार भरून वर्षभर किंवा २०० ट्रिपपर्यंत टोलमुक्त प्रवास करता येणार आहे. ही योजना १५ ऑगस्टपासून देशभर लागू होणार आहे.

केंद्र सरकार ३ हजार रुपयांचा फास्टॅग-आधारित वार्षिक पास सादर करत आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे दिली. येत्या १५ ऑगस्टपासून हा पास जारी केला जाणार असून, तो केवळ गैर-व्यावसायिक खासगी वाहनांसाठी उपलब्ध असेल. गडकरी यांनी सांगितले की, हा पास सक्रिय केल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा २०० फेऱ्या पूर्ण होईपर्यंत (यापैकी जे आधी घडेल) वैध राहील.

नवीन धोरणाचा उद्देश काय? 

नवीन धोरण ६० किलोमीटरच्या परिघात असलेल्या टोलनाक्यांसंदर्भातील जुन्या समस्यांचे निराकरण करते. एकाच, परवडणाऱ्या व्यवहाराद्वारे टोल भरणे सुलभ करते. टोलनाक्यांवरील वेळ कमी करणे, वाहतूक कोंडीतून सुटका करणे आणि टोल प्लाझावरील वाद कमी करणे यासह लाखो खासगी वाहनांना जलद आणि सुलभ प्रवासाचा अनुभव देणे, हा या वार्षिक पासचा उद्देश आहे," असेही गडकरींनी स्पष्ट केले. 

नवीन वार्षिक FASTag पासची वैशिष्ट्ये काय?

  • किंमत : ३ हजार रूपये

  • वैधता : सक्रियतेच्या तारखेपासून एक वर्ष किंवा २०० ट्रिप्स (जे आधी संपेल)

  • सुरुवात तारीख : १५ ऑगस्ट २०२५

कोण असणार पात्र?

  • ही योजना फक्त खासगी (नॉन-कमर्शियल) वाहनांसाठी उपलब्ध असेल.

  • पास एकदा सक्रिय केल्यावर तो एक वर्ष किंवा २०० प्रवासांपर्यंत, यापैकी जे आधी संपेल, तेवढ्यासाठीच वैध असेल.

पास कसा काढायचा ?

  • वार्षिक पास सक्रिय करण्यासाठी किंवा नूतनीकरणासाठी एक स्वतंत्र लिंक लवकरच हायवे ट्रॅव्हल अॅप आणि NHAI/MoRTH वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल.

  • नागरिक ही लिंक सुरू झाल्यानंतर या अधिकृत अॅपद्वारे हा पास अ‍ॅक्टिवेट करू शकतील.

  • तसेच NHAI (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट्सवरूनही पास मिळवता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT