नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
देशात कोरोनाचा अभूतपूर्व हाहाकार सुरु झाल्याने केंद्र सरकारविरोधात कमालीचा रोष उफाळून आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात #ResignModi ट्रेंड होत आहे. हा ट्रेंड ट्विटर आणि फेसबुकवरही मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत असल्याचे दिसून आले आहे.
अधिक वाचा : दिल्लीत कोरोनाचा कहर; भाजपला आरएसएसचा घरचा आहेर!
#ResignModi हा फेसबुकवरील ट्रेंड फेसबुकने ब्लॉक केल्याने मोठा वाद निर्माण झाला. या वादावर अखेर फेसबुकने खुलासा करत चुकून झाल्याची सारवासारव केली व नंतर ब्लॉक काढून टाकला. सरकारच्या आदेशानुसार हे केले गेले नाही असे सांगत बुधवारी कंपनीने हॅशटॅग ब्लॉक करण्यावर स्पष्टीकरण दिले. कोविड साथीवरून पोस्ट सेन्सॉर करणारे फेसबुक ही पहिली सोशल मीडिया कंपनी नसून सरकारच्या आदेशानुसार ट्विटरने बऱ्याच पोस्ट हटवल्या आहेत.
अधिक वाचा : 'मोदी राजीनामा द्या' ट्रेंड हटविण्यास आम्ही सांगितले नाही!
चुकून हे हॅशटॅग बंद झाले : फेसबुक
फेसबुकच्या प्रवक्त्याने गुरुवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही चुकून हे हॅशटॅग तात्पुरते बंद केले, भारत सरकारने आम्हाला तसे करण्यास सांगितले नाही. आम्ही ते पुनर्संचयित केले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याच्या मागणी करणारे हॅशटॅग फेसबुकने ब्लॉक केले होते.
अधिक वाचा : 'कोरोना लसीमुळे रुग्णालयात दाखल होण्याचा आणि मृत्यूचा धोका कमी'
#ResignModi हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड झाल्यानंतर तो ब्लॉक करणं हा सार्वजनिक असंतोषावर नियंत्रण मिळवण्याचा एक प्रयत्न होता, असा आरोप अमेरिकन 'वॉल स्ट्रीट जर्नल'कडून करण्यात आला होता. हा आरोप संपूर्णत: खोटा असल्याचे भारत सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.
'वॉल स्ट्रीट जर्नल'ने पाच मार्च रोजी ही बातमी प्रकाशित झाली होती. या बातमीचा संदर्भ देत ही बातमी संपूर्णत: बनावट आणि 'निर्मित' असल्याचे मोदी सरकारने म्हटले आहे. 'सरकारकडून हा हॅशटॅग हटवण्याचे निर्देश देण्यात आले नव्हते. फेसबुकनंही हा हॅशटॅग चुकीनं हटविल्याचे स्पष्ट केले आहे, असे सरकारच्या खुलाशात म्हटले आहे.