Crime News file photo
राष्ट्रीय

Crime News: आईचं 'ते' गुपित ७ वर्षांच्या मुलाला समजलं; त्यानंतर प्रियकराने जे केलं ते पाहून पोलीसही हादरले

प्रेमसंबंधांची माहिती मिळाल्याने आईच्या प्रियकराने सात वर्षांच्या चिमुरड्याची निर्घृण हत्या केली.

पुढारी वृत्तसेवा

Uttar Pradesh Crime Extra Marital Affair

मेरठ: उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात प्रेमसंबंधांची माहिती मिळाल्याने आईच्या प्रियकराने सात वर्षांच्या चिमुरड्याची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी मृत मुलाच्या आईच्या प्रियकराला अटक केली असून, त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. आईचे असलेले प्रेमसंबंध या निष्पाप मुलाला समजल्यामुळेच त्याची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी बहसुमा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हा लहान मुलगा बेपत्ता झाला होता. मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तात्काळ चार पथके तयार केली होती. तपास सुरू असताना पोलिसांनी संशयाच्या आधारे अर्पित शर्मा नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपीने दाखवलेल्या शेतातून मुलाचा मृतदेह हस्तगत केला.

...म्हणून मुलाचा काटा काढला!

पोलीस अधीक्षक अभिजित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अर्पित शर्मा याचे मृत मुलाच्या आईसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधांची माहिती त्या ७ वर्षांच्या मुलाला मिळाली होती. आपले बिंग फुटण्याच्या भीतीने आरोपीने मुलाला घरातून सोबत नेले आणि शेतात नेऊन त्याची हत्या केली. दरम्यान, या प्रकरणात अद्याप तरी तपासात आतापर्यंत अपहरणाचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही, असे त्यांनी सांगितले.

पोलिसांनी आरोपीचा मोबाईल फोन जप्त केला असून, या गुन्ह्यामागील नेमका हेतू आणि घटनाक्रम समजून घेण्यासाठी इतर तांत्रिक पुरावे गोळा केले जात आहेत. बहसुमा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT