Cancer Medicines Price Reduction | कॅन्सरवरील महागडी औषधे ७० टक्क्यांपर्यंत स्वस्त होणार 
राष्ट्रीय

Cancer Medicines Price Reduction | कॅन्सरवरील महागडी औषधे ७० टक्क्यांपर्यंत स्वस्त होणार

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : कर्करोगासारख्या गंभीर आजारावर प्रभावी ठरणाऱ्या औषधांच्या किमती आता थेट ७० टक्क्यांपर्यंत कमी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सर्व विनानियंत्रित (नॉनशेड्युल्ड) कॅन्सर औषधांच्या ‘ट्रेड मार्जिन’वर (व्यापारी नफा) ३० टक्क्यांची कमाल मर्यादा लागू करण्याची घोषणा केली आहे.

त्यामुळे देशभरातील लाखो रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा नियम मुख्यत्वे महागड्या कॅन्सर औषधांशी संबंधित आहे. सर्वसामान्य औषधांवरही ३० टक्क्यांची मर्यादा लादली तर कंपन्यांना त्यांचे मार्केटिंग आणि वितरण परवडणार नाही आणि त्या बाजारातून गायब होण्याची भीती आहे. त्यामुळे पुरवठा साखळीवर परिणाम न होता रुग्णांना जास्तीत जास्त आर्थिक दिलासा मिळावा, यादृष्टीने हे धोरण आखण्यात आले आहे.

‘ट्रेड मार्जिन’ मर्यादा ३० टक्के

रुग्णांची वार्षिक बचत सुमारे २,५०० रुपये कोटी

औषधांच्या किमतीत होणारी कपात ७० टक्क्यांपर्यंत

आदेश लागू होण्याचा कालावधी १० दिवस

सवलत मिळणाऱ्या औषधांची संख्या ११०

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT