तिरुचिरापल्ली येथील एमआर पलयम येथील हत्ती बचाव आणि पुनर्वसन केंद्रात हत्तींना थंडावा मिळावा म्‍हणून विविध उपाययोजना राबवल्‍या जात आहेत. ANI Photo
राष्ट्रीय

उन्हाने लाहीलाही... गजराजासाठी थंडगार 'शॉवर'सह स्विमिंग टँकची पर्वणी! (पाहा Video)

तामिळनाडूतील हत्तींच्‍या आश्रयस्‍थानात वन खात्‍याकडून विविध उपाययाेजना!

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : " यंदा ऊन जरा जास्त आहे..." दरवर्षी उन्‍हाळा सुरु झालं की प्रत्‍येकाच्‍या तोंडी हे वाक्‍य असतं. आता देशातील विविध राज्‍यांमध्‍ये चैत्र महिन्‍यातच वैशाख वणवा जाणवत आहे. आपण या उन्‍हात गारवा शोधण्‍यासाठी काही कृत्रिम उपाय करतो. फॅन, कुलर आणि वातानुकुलित (एसी) यंत्रणा राबवून थंडावा निर्माण करताे. मात्र उन्‍ह्यात खर्‍या अर्थाने होरपळ हाेते ती मुक्‍या प्राण्‍यांची. आता तापमानात वाढ होत असताना तिरुचिरापल्ली येथील एमआर पलयम येथील हत्ती बचाव आणि पुनर्वसन केंद्रात हत्तींना थंडावा मिळावा यासाठी विविध उपाययोजना राबवल्‍या जात आहेत.

हत्तींसाठी शॉवर बाथ, मातीचे स्‍नान आणि स्विमिंग पूलची व्यवस्था!

तिरुचिरापल्ली येथील एमआर पलयम येथील हत्ती बचाव आणि पुनर्वसन केंद्र आहे. या केंद्रातील वन अधिकाऱ्यांनी हत्तींना थंड राहण्यास मदत करण्यासाठी शॉवर बाथ, मातीचे स्नान आणि स्विमिंग पूलची व्यवस्था केली आहे. याव्यतिरिक्त, तापमान नियंत्रित करण्यासाठी हत्तींच्या आश्रयस्थानांमध्ये ओव्हरहेड फॉगर बसवण्यात आले आहेत. प्राण्यांना हायड्रेटेड ठेवण्यासाठी टरबूजसारखी पाण्याने समृद्ध फळे देखील दिली जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT