Epstein case controversy 
राष्ट्रीय

Epstein case controversy | एपस्टीन प्रकरणी काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप

इस्रायलचे माजी पंतप्रधान एहूद बराक यांचीही या प्रक्रियेत भूमिका असल्याचा आरोप काँग्रेसने केला

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे “तडजोडीच्या स्थितीत” असून त्यांचे नियंत्रण बाहेरील शक्तींकडे आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसने केला. तसेच जेफ्री एपस्टीनने मोदी आणि तत्कालीन ट्रम्प सल्लागार स्टीव्ह बॅनन यांच्यात भेट घडवून आणण्याची ऑफर दिली होती आणि त्यानंतर “मोदी ऑन बोर्ड” असा ईमेल पाठवला होता, असा दावा काँग्रेसने केला. 

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा यांनी दिल्लीस्थित पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यामध्ये काही ईमेल्सच्या क्रमाचा दाखला देत हे आरोप केले. तसेच एपस्टीनला पंतप्रधानांपर्यंत असा प्रवेश कसा मिळाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खेडा यांनी उद्योगपती अनिल अंबानी यांचाही उल्लेख केला. त्यांच्या मते, मोदींच्या २०१७ मधील अमेरिका दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर अंबानी यांनी एपस्टीनशी संवाद साधला होता.

२ मार्च २०१७ रोजी अंबानी यांनी व्हाईट हाऊसशी संपर्क आणि भारत-अमेरिका संरक्षण सहकार्याबाबत सल्ला मागितल्याचा ईमेल असल्याचा दावा त्यांनी केला. “सरकारच्या वतीने अंबानी कोणत्या अधिकारात संवाद साधत होते?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, इस्रायलचे माजी पंतप्रधान एहूद बराक यांचीही या प्रक्रियेत भूमिका असल्याचा आरोप काँग्रेसने केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT