केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. File Photo
राष्ट्रीय

मणिपूरबाबत अमित शहांची माेठी घोषणा, ८ मार्चपासून राज्‍यातील सर्व बंद रस्ते खुले करण्‍याचे आदेश

उच्‍चस्‍तरीय बैठकीत घेतला राज्‍यातील सुरक्षेचा आढावा

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मणिपूरमधील सुरक्षा व्‍यवस्‍थेचा आढावा बैठक आज केंद्रीय गृहंमत्री अमित शहा यांनी घेतली. यावेळी त्‍यांनी ८ मार्चपासून मणिपूरमधील सर्व रस्त्यांवर लोकांची सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूरच्या सुरक्षा परिस्थितीबाबत बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी त्‍यांनी राज्‍यातील सुरक्षा व्‍यवस्‍थेचा आढावा घेतला. ८ मार्चपासून मणिपूरमधील सर्व मार्गांवर मुक्तपणे सार्वजनिक हालचाली सुनिश्चित करण्याचे आणि अडथळ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच राज्‍यातील अमली पदार्थांच्‍या रॅकेटचे उच्चाटन करण्याच्या सूचनाही त्‍यांनी अधिकार्‍यांना दिल्‍या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT