पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीर मुख्यमंत्रीपदी आज (दि.१६) नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुला यांनी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यानंतर अवामी इत्तेहाद पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार शेख अब्दुल रशीद उर्फ इंजिनियर रशीद ( Engineer rashid ) यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला आणि त्यांचे पूत्र ओमर अब्दुल्ला यांच्यावर हल्लाबोल केला.
ANIशी बोलताना इंजिनिअर राशिद म्हणाले की, ओमर अब्दुला यांना आमच्या शुभेच्छा आहेत. आता आम्हाला आशा आहे की त्यांनी त्यांची आश्वाासने पूर्ण करावीत. आम्ही केंद्रालाही विनंती करतो. सरकार त्यांना सहकार्य करेल.ओमर अब्दुल्ला जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवण्याचे, कलम 370 आणि 35A याबाबत बोलत असतात;पण ते ३७० कलपापासून पळून जात आहेत. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्द केले, तेव्हा तीन दिवस आधी त्यांनी फारुख अब्दुल्ला यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर फारुख अब्दुल्ला म्हणाले की काहीही रद्द केले जाणार नाही. यानंतर फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांना गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले होते. पंतप्रधान मोदींनी सर्वांशी चर्चा करून कलम ३७० हटवले हे एक मॅच फिक्सिंग होते, यात शंका नाही. भाजपच्या मदतीनेच जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स सत्तेत आले आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir) मुख्यमंत्रीपदी आज बुधवारी (दि. १६) ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah Oath Ceremony) यांनी शपथ घेतली. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यावेळी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि इंडिया आघाडीचे नेते उपस्थित होते.
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने मिळून ही निवडणूक लढवली होती. पण काँग्रेस नवीन जम्मू आणि काश्मीर सरकारमध्ये सहभागी झालेले नाही. काँग्रेसने नवीन सरकारमध्ये एका मंत्रिपदाची ऑफर नाकारली आहे. त्याऐवजी बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
पटियाला हाऊस कोर्टाने बारामुल्लाचे खासदार इंजिनिअर राशिद यांचा अंतरिम जामीन २८ ऑक्टोबरपर्यंत वाढवला आहे. यापूर्वी त्यांचा अंतरिम जामिनाला १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीपूर्वी ११ सप्टेंबर रोजी इंजिनिअर राशिद यांची तिहार तुरुंगातून जामीनावर सुटका झाली होती. दिल्ली न्यायालयाने टेरर फंडिंग प्रकरणी न्यायालयाने त्यांना 2 ऑक्टोबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. २ ऑक्टोबरला यामध्ये १० दिवसांची वाढ करण्यात आली. त्यामुळे त्याच्या आत्मसमर्पणाची तारीख 13 ऑक्टोबर ऐवजी 15 ऑक्टोबर झाली. आता सलग तिसऱ्यांदा त्यांच्या अंतरिम जामीन मुदतीत वाढ करण्यात आली असून आता २८ ऑक्टोबरपर्यंत त्यांना दिलासामिळघला आहे.
2017 च्या दहशतवादी फंडिंग प्रकरणी रशीद यांना राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) अटक केली होती. 2019 पासून तिहार तुरुंगात होते. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीच्या तिहार तुरुंगातून त्यांची ११ सप्टेंबर रोजी अंतरिम जामीनावर मुक्तता करण्यात आली होती. कारागृहातून जामीनावर सुटका झाली. इंजिनियर रशीद यांच्या अवामी इत्तेहाद पक्षाने बंदी घातलेल्या जमात-ए-इस्लामीच्या माजी सदस्यांशी युती करून निवडणूक लढवली होती. २०२४ लोकसभा निवडणुकीमध्ये माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा पराभव करून रशीद यांनी सर्वांना धक्का दिला होता.