प्रातिनिधिक छायाचित्र.  File Photo
राष्ट्रीय

'युपी'त चकमक, 'STF'ने केला चार दरोडेखोरांचा खात्‍मा

Encounter in Uttar Pradesh : पाेलीस निरीक्षक गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेश पोलिसांनी राज्‍यातील कुख्‍यात गुंडांवरील धडक कारवाई सुरु ठेवली आहे. साेमवारी (दि.२१) शामली जिल्ह्यातील झिन्झाना भागात झालेल्‍या चकमकीत चार दरोडेखोर ठार झाले. तर विशेष कृती दल(एसटीएफ)चे निरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत, असे वृत्त ANIने दिले आहे.

मुस्तफा कग्गा टोळीतील अर्शदचा खात्‍मा

मुस्तफा कग्गा टोळीतील गुंड अर्शदसह त्‍याचे तीन साथीदार शामलीच्या झिंझाना भागात दरोडा टाकण्‍यासाठी जात असल्‍याची माहिती मेरठ एसटीएफला मिळाली. पथकाने झिंझानाच्या उदपूर गावातील जंगलात गुंडांना रोखले. उदयपूरमधील वीटभट्टीजवळ गुंडांचीकार रोखण्याचा प्रयत्नाचा एसटीएफ पथकाने प्रयत्‍न केला. त्‍यांनी पोलिसांवर गोळीबार करुन पलायनाचा प्रयत्‍न केला. यावेळी पोलिसांनी चोख प्रत्‍युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी बराच वेळ गोळीबार सुरू राहिला. या चकमकीत मुस्तफा कग्‍गा टोळीतील १ लाख रुपयांचा बक्षीस असलेला अर्शदसह मनजीत, सतीश आणि एक अज्ञात साथीदार चकमकीत ठार झाले आहेत.

पोलिस निरीक्षक सुनील कुमार गंभीर जखमी

दरोडेखोरांनी केलेल्‍या गोळीबारात पोलिस निरीक्षक सुनील कुमार गंभीर जखमी झाले आहेत. त्‍यांना गुरुग्राममधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस महानिरीक्षक अजय साहनी आणि शामलीचे पोलीस अधीक्षक रामसेवक गौतम घटनास्थळी पोहोचले. दरोडेखोरांकडे असणार्‍या पिस्तूल आणि बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत.

अर्शदवर १७ गुन्हे दाखल

अर्शद हा सहारनपूर येथील पोलिस स्टेशन बेहट येथे दरोडा प्रकरणात हवा होता आणि त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्‍याच्‍यावर हरियाणातील शामली, सहारनपूर आणि पानीपत येथे दरोडा, खून आणि इतर गुन्ह्यांचे गुन्हे दाखल असल्‍याची माहिती एसटीएफने दिली.

पॅरोलवर सुटलेल्‍या गुंडही ठार 

सोनीपतच्या मनजीतला काही प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तो पॅरोलवर तुरुंगाबाहेर होता. बाहेर आल्यानंतर तो गुन्हे करत होता. आता गुन्हेगार झिंझाना परिसरात काहीतरी मोठे गुन्हे करण्याची योजना आखत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT