राष्ट्रीय

पुलवामामध्‍ये चकमक, पाेलीस-सुरक्षा दलांकडून शाेध माेहिम

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पुलवामा जिल्ह्यातील निहामा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. पोलीस आणि सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती काश्‍मीर पोलिसांनी आज (दि.३ जून) सकाळी सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून दिली आहे.

पुलवामा जिल्ह्यातील निहामा भागात चकमक सुरू झाली आहे. पोलीस आणि सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. तत्पूर्वी, कुपवाडा येथे भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि युद्धसामग्रीचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता.

SCROLL FOR NEXT