छत्तीसगडच्या विजापूर-दंतेवाडा सीमेवरील जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.  (file photo)
राष्ट्रीय

विजापूर-दंतेवाडा सीमेवरील जंगलात चकमक, एक जवान शहीद, २ नक्षलवादी ठार

Chhattisgarh | शस्त्रे आणि दारूगोळा जप्त

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडच्या (Chhattisgarh) गंगलूर पोलीस हद्दीतील विजापूर-दंतेवाडा सीमेवरील जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान विजापूर जिल्हा राखीव (DRG) दलातील एका जवान शहीद झाला. तर या कारवाईदरम्यान २ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांच्याकडून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. येथे अजून चकमक आणि शोध मोहीम सुरू असल्याची माहिती विजापूर पोलिसांनी दिली आहे.

सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने गंगलूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवाद्यांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. यादरम्यान विजापूर-दंतेवाडा सीमेवरील जंगली भागात चकमक सुरू झाली, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

गुप्त माहितीच्या आधारे इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात जिल्हा राखीव रक्षक दल, विशेष कार्य दल आणि बस्तर फायटर्ससह संयुक्त सुरक्षा दलांनी नक्षल्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे. यादरम्यान पहाटे चकमक सुरू झाली. यावेळी सुरक्षा दलांनी एके ४७, एसएलआर, INSAS रायफल्स आणि स्फोटकांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला.

९ फेब्रुवारी रोजीच्या कारवाईत ३१ नक्षली ठार

याआधी ९ फेब्रुवारी रोजी विजापूर जिल्ह्यातील जंगलात झालेल्या चकमकीत ३१ नक्षल्यांना ठार करण्यात आले होते. या दरम्यान दोन सुरक्षा कर्मचारी शहीद झाले होते.

गेल्या आठवड्यात छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात तब्बल १७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. सुरक्षा दलांनी फेब्रुवारीमध्ये विजापूर जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण १८ नक्षलवाद्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून स्फोटकेही जप्त करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT