Reddit viral story AI Photo
राष्ट्रीय

Viral News: 'पोटात दुखतंय' खोटं सांगून फिरायला गेला, व्हायरल रीलच्या बॅकग्राउंडमध्ये मॅनेजरला दिसला, पुढे काय झालं?

कामावरून सुट्टी मिळवण्यासाठी आजारपणाचे कारण देणे एका कर्मचाऱ्याला भलतेच महागात पडले आहे. मॅनेजरने त्याला तीच रील पाठवत अवघ्या पाच शब्दांत असा संदेश दिला की, कर्मचाऱ्याची बोलतीच बंद झाली.

पुढारी वृत्तसेवा

Reddit viral story

मुंबई: कामावरून सुट्टी मिळवण्यासाठी आजारपणाचे कारण देणे एका कर्मचाऱ्याला भलतेच महागात पडले आहे. पोटात दुखत असल्याचं खोटं सांगून कुर्ग येथे फिरायला गेलेल्या कर्मचाऱ्याची पोलखोल एका 'व्हायरल रील'मुळे झाली. विशेष म्हणजे, मॅनेजरने त्याला तीच रील पाठवत अवघ्या पाच शब्दांत असा संदेश दिला की, कर्मचाऱ्याची बोलतीच बंद झाली.

'रेडिट' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर झालेला हा किस्सा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. संबंधित कर्मचाऱ्याने शुक्रवारी 'पोटात इन्फेक्शन' झाल्याचे सांगून ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. मात्र, आजारी असण्याऐवजी तो थेट कुर्ग येथे फिरण्यासाठी गेला होता.

तिथे काही लोक डान्स करत असताना हा कर्मचारी नकळतपणे व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड झाल्यानंतर त्याला तब्बल १३ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आणि तो प्रचंड व्हायरल झाला.

सोमवारी जेव्हा कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाला, तेव्हा त्याच्या 'स्किप-लेव्हल' मॅनेजरने त्याला थेट तोच व्हायरल रील मेसेज केला. सोबत फक्त पाच शब्दांची एक ओळ लिहिली "आशा आहे आता तुझं पोट ठीक असेल". या पाच शब्दांतच मॅनेजरने त्याला त्याच्या खोटेपणाची जाणीव करून दिली.

या प्रकारानंतर कर्मचाऱ्याची नोकरी वाचली असली, तरी मॅनेजरचा त्याच्यावरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे आता त्याचे 'वर्क फ्रॉम होम'चे अर्ज नाकारले जात असल्याचे त्याने सांगितले. सोशल मीडियाच्या युगात आपण टाकलेली एक छोटीशी पोस्ट किंवा रील आपल्या नकळत कुठपर्यंत पोहोचू शकते, याचाच धडा या घटनेतून मिळतो. नेटिझन्सनी यावर मजेशीर प्रतिक्रिया देत "खोटं फार काळ टिकत नाही" असा सल्लाही दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT