पुढारी ऑनलाईन डेस्क : JD Vance India Visit | अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स हे आजपासून (दि.२१) पुढील चार दिवस भारत दौऱ्यावर आले आहेत. व्हान्स यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे. यावेळी व्हान्स यांची भारतीय वंशाची पत्नी उषा वान्स आणि त्यांची मुलेदेखील भारत दौऱ्यावर आली आहेत. व्हान्स यांचे राजकीय दौऱ्यांच्या पलीकडे एक भावनिक नातेदेखील आहे. तर जाणून घेऊया अमेरिकेचे जेडी वान्स यांचे भारताशी काय नाते आहे?.
डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू सहकारी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि उषा व्हान्स हे पती-पत्नी आहेत. उषा वान्स या भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या नागरिक आहेत. अमेरिकेच्या सेकंड लेडी म्हणूनदेखील उषा व्हान्स यांची ओळख आहे. त्यांचे आई-वडील हे आंध्र प्रदेशचे रहिवाशी होते. त्यानंतर ते अमेरिकेचे नागरिक बनले. त्यामुळे तसे पाहिले तर जेडी वान्स हे भारताचे जावई आहेत.
उषा बाला चिलुकुरी व्हान्स यांचा जन्म 6 जानेवारी 1986 रोजी झाला. त्या अमेरिकन वकील आहेत, ज्या 2025 पासून अमेरिकेच्या द्वितीय महिला नागरीक आहेत. त्यांचे लग्न अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्याशी झाले. त्या पहिल्या आशियाई अमेरिकन आणि दुसऱ्या हिंदू अमेरिकन महिला आहेत.
उषा व्हान्स यांचा जन्म कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो काउंटी येथे तेलुगु भारतीय स्थलांतरित कुटुंबात झाला आणि त्या एका उच्च-मध्यमवर्गीय उपनगरात वाढल्या. त्यांनी येल विद्यापीठातून इतिहासात पदवी आणि येल लॉ स्कूलमधून ज्युरिस डॉक्टर पदवी प्राप्त केली.
उषा व्हान्स यांचा भारताशी थेट संबंध आहे. त्यांचे आई-वडील भारतातच होते. त्यांचे आई-वडील आंध्र प्रदेशातील आहेत. नंतर ते अमेरिकेत जाऊन स्थायिक झाले. उषा मात्र, अमेरिकेत जन्मल्या आणि वाढल्या. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मी आणि वडिलांचे नाव राधाकृष्ण आहे. ते 1980 मध्ये अमेरिकेत स्थायिक झाले होते. उषाची आई जीवशास्त्रज्ञ आणि वडील अभियंता आहेत.
2014 मध्ये उषा यांनी जेडी व्हान्स यांच्यासोबत लग्न केले. उषा आणि जेडी व्हान्स या दोघांनी लग्नात पारंपारिक भारतीय पोशाख परिधान केला होता. उषा व्हान्स यांच्या संपत्तीचा विचार केल्यास, मीडिया रिपोर्ट्सनुसार, उषा आणि त्यांचे पती जेडी व्हान्स यांच्याकडे अफाट संपत्ती आहे. व्हान्स रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सी इत्यादींमध्ये त्या गुंतवणूक करतात. फोर्ब्सच्या मते, जेडी व्हान्सची एकूण संपत्ती सुमारे 10 दशलक्ष डॉलर (सुमारे 85 कोटी रुपये) आहे. ऑगस्ट 2014 मध्ये, उषा व्हान्स आणि जेडी व्हान्स यांनी लग्नानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये 5 कोटी 37 लक्ष 8 हजार रुपयांचे घर खरेदी केले.
फोर्ब्सच्या अहवालानुसार, घराची किंमत आता सुमारे 7 कोटी 25 लाख 79 हजार 164 रुपये इतकी आहे. उषा आणि जेडी व्हान्स यांनी सिनसिनाटीच्या ईस्ट वॉलनट हिल्समध्ये 1.4 डॉलर मिलियनमध्ये एक घर विकत घेतले आहे.