Electric Car Scooter Interest Rate: इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी या गाड्यांवर देण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याज कमी होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक बस आणि ट्रक खरेदी करण्यासाठी देखील सर्व बँकांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी अवजड उद्योग मंत्रालयाच्या वतीने सरकारी आणि खासगी दोन्ही बँकांना इलेक्ट्रिक बस आणि ट्रक खरेदीशी संबंधित कर्जाबबात बैठक बोलवण्यात आली होती. इलेक्ट्रिक बस आणि ट्रक खरेदीला चालना देण्यासाठी सरकार व्याजदरात तीन ते पाच टक्क्यांची सूट देऊ शकते. याचा बोजा सरकार उचलणार आहे. तसेच या कर्जाच्या गॅरेंटीचा काही हिस्सा सरकार घेण्याची देखील शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसा इलेक्ट्रिक कार आणि टू व्हिलर कर्जाचे व्याज दर देखील कमी करण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडून बँकांना निर्देश देण्यात आले आहेत. सर्व इलेक्ट्रिक कार खरेदीवर ७.६० टक्क्यांपासून ११.५० टक्क्यांपर्यंत व्याज द्यावे लागते. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय अशा प्रकारच्या लोनवर ८.९ ते ११.५० टक्क्यांपर्यंत व्याज लावते. दुसरीकडे इलेक्ट्रिक टू व्हिलर कर्जाचे व्यादर हे १० ते २० टक्क्यांपर्यंत आहेत.
इलेक्ट्रिक वाहनांवरील कर्जाचे व्यादर कमी करण्याचा निर्णय पूर्णपणे बँकांवर अवलंबून आहे. इराण युएस युद्धामुळे अजून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे त्याच्या किंमती चढ्याच राहण्याची शक्यता आहे. अशात सरकार पेट्रोल आणि डिझेलला पर्यायी साधनांना जास्तीजास्त प्रोत्साहित करत आहे. त्यामुळेच बँकांना यावरील कर्जाचे व्याजदर कमी करण्यास सांगण्यात आलं आहे.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या आकड्यानुसार या वर्षी एप्रिल महिन्यात पेट्रोल कारच्या तुलनेत इलेक्ट्रिक कारची विक्री ही सहा टक्के होती. गेल्या वर्षी ती ३.७ टक्के होती. या वर्षी मार्चमध्ये याची हिस्सेदारी ५.१ टक्के राहिली होती. टू व्हिलरच्या बाबतीत बोलायचं झालं तर याची टक्केवारी ९.८ टक्क्यांपर्यंत पोहचली होती.
बँकांना घरावर सोलर पॅनल लावण्यासाठी कमी व्याजदरावर जास्तीजास्त कर्ज देण्यास सांगण्यात आले आहे. अजूनही सामन्य लोकांना घरावर सोलर पॅनल लावण्यासाठी बँकांकडून कर्ज मिळतं हे माहिती नाही. पंजाब नॅशनल बँक रूफ टॉप सोलन पॅनल लावण्यासाठी ६.५ टक्के व्याजदराने कर्ज देत आहे.