राष्ट्रीय

भारतीय मतदारांनी नाेंदवला जागतिक विक्रम : मुख्‍य निवडणूक आयुक्‍त राजीव कुमार

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या (४ जून) जाहीर होणार आहे. आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीत सहभागी झालेल्या सर्व मतदारांचे अभिनंदन केले. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीत 31 कोटी 20 लाख महिलांसह 64 कोटी 20 मतदारांच्या सहभागाने जागतिक विक्रम केला आहे. ही आकडेवारी जी-7 देशांच्या मतदारांच्या १.५ पट आणि २७ युरोपियन युनियन देशांमधील मतदारांच्या 2.5 पट आहे."

यावेळी राजीव कुमार म्‍हणाले की, लोकसभा निवडणुकीत 31.2 कोटी महिलांसह 64.2 कोटी मतदारांच्या सहभागाने भारताने जागतिक विक्रम केला.जगातील सर्वात मोठ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये 68,000 पेक्षा जास्त देखरेख टीम, 1.5 कोटी मतदान केंद्र आणि सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश होता. यंदाच्‍या निवडणुकीसाठी सुमारे चार लाख वाहने, 135 विशेष गाड्या आणि 1,692 हवाई उड्डाणे वापरली गेली.

फक्‍त ३९ ठिकाणी घ्‍यावे लागले फेरमतदान

२०१९ लोकसभा निवडणुकीत देभरात ५४० ठिकाणी फेरमतदान घेण्‍यात आले होते. मात्र यंदा केवळ ३९ ठिकाणी फेरमतदान घ्‍यावे लागले. तसेच जम्मू आणि काश्मीरमध्ये चार दशकांतील सर्वाधिक एकूण 58.58 टक्के मतदान झाल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

सुमारे १० हजार कोटी रुपयांची रोकड जप्‍त

"निवडणूक आयोगाने या निवडणुकीदरम्यान सुमारे 10,000 कोटी रुपयांची रोकड जप्‍त केली. हाही एक विक्रम आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये जप्त केलेल्या मूल्याच्या सुमारे 3 पट असल्‍याचे राजीव कुमार यांनी सांगितले.

पोस्टल मतदानाची मोजणीनंतरच ईव्हीएम मोजणी

मंगळवार ४ जून रोजी होणार्‍या मतमोजणी प्रक्रियेबाबत माहिती देताना राजीव कुमार म्‍हणाले की, "पोस्टल मतदानाची मोजणी आधी सुरू होईल. यानंतर अर्ध्या तासानंतर ईव्हीएम मोजणी सुरू करण्‍यात येईल."

SCROLL FOR NEXT