पुढारी ऑनलाईन डेस्क : भुवनेश्वर येथील ओडिशामध्ये कालांकाडी पोलिसांनी झारखंडमधील 8 आतंरराज्यीय दरोडेखोरांना अटक केली. अटकेनंतर त्यांच्याकडून 3.51 कोटी रुपये रोकड जप्त करण्यात आली. यानंतर त्यांना धर्मगढ येथील पोलिस ठाण्यामध्ये नेण्यात आले. यावेळी त्यांच्याकडून अनेक शस्त्रे आणि इतर वस्तू देखील जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यासोबतच अटक केलेल्या दरोडेखोरांवर अनेक दरोडे आणि दरोड्यांच्या घटनामध्ये सहभागी असल्याचा आरोप आहेत. अशी माहिती वृत्तसंस्था 'एएनआय'ने सोशल मीडिया 'एक्स'वर पोस्ट करत दिली आहे.