राष्ट्रीय

‘ही तर व्यवस्थेला थप्‍पड’ : केजरीवालांच्‍या भाषणावर ‘ईडी’चा आक्षेप

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आपच्‍या झाडू या चिन्‍हाला मतदान केले तर मला पुन्‍हा तुरुंगात जावे लागणार नाही, भाजप विरोधी 'इंडिया' आघाडीने विजय मिळवला, तर लोकसभा निवडणूक निकालाच्‍या दुसर्‍या दिवशी म्‍हणजे ५ जून रोजी मी तिहार कारागृहात बाहेर असेन, अशी टिप्‍पणी दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतीच नगरसेवकांच्‍या बैठकीत केली होती. यावर सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) सर्वोच्‍च न्‍यायालयात आक्षेप घेतला. अशा प्रकराचे भाषण ही व्‍यवस्‍थेला थप्‍पड आहे, असा आक्षेप चे ईडीने  केजरीवाल यांची याचिकेवरील सुनावणीवेळी नाेंदवला. या वेळी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला.

काय म्‍हणाले हाेते केजरीवाल ?

नगरसेवकांच्‍या बैठकीत बोलताना केजरीवाल म्‍हणाले होते की, "आपण आता परिश्रम घेतले आणि इंडिया आघाडीने निवडणूक जिंकेल; पण आता कठोर परिश्रम केले नाही तर आम्ही पुन्हा कधी भेटू शकतो हे मला माहित नाही,मी २ जूनला तिहार तुरुंगात परतणार आहे.४ जूनला तिहार तुरुंगात निवडणूक निकाल पाहणार आहे. भाजप विरोधी 'इंडिया' आघाडीने विजय मिळवला, तर लोकसभा निवडणूक निकालाच्‍या दुसर्‍या दिवशी म्‍हणजे ५ जून रोजी मी तिहार कारागृहात बाहेर असेन, "

'ईडी'चा भाषणावर आक्षेप, सर्वोच्‍च न्‍यायालयाचा भाष्‍य करण्‍यास नकार

ईडीने अरविंद केजरीवाल यांनी केलेल्‍या भाषणाबाबत सर्वोच्‍च न्‍यायालयात आक्षेप नोंदवला. यावर यावर न्यायमूर्ती संजीव खन्ना म्हणाले, "आम्ही निकालावरील टीकेचे स्वागत करतो. मात्र आम्ही त्यात जाणार नाही. केजरीवाल यांना ४ जून रोजी शरण जावे लागेल तेव्हा आमचा आदेश स्पष्ट आहे. कायद्याचे राज्य आहे. याद्वारे शासित व्हा आम्ही कोणासाठीही अपवाद केला नाही."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT