राष्ट्रीय

मंत्री राजकुमार आनंद यांच्या घरावर ‘ईडी’चा छापा

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दिल्लीच्या केजरीवाल मंत्रिमंडळातील समाजकल्याणमंत्री राजकुमार आनंद यांच्या घरावर गुरुवारी सकाळी सक्तवसुली संचालनालय म्हणजेच 'ईडी'ने छापा टाकला. तपास यंत्रणा आनंद यांच्या घरासह 9 ठिकाणी तपास करत असून, हे प्रकरण मनी लाँडरिंगशी संबंधित आहे.

आनंद हे 2020 मध्ये पहिल्यांदा पटेलनगर मतदारसंघातून आमदार झाले. याआधी त्यांच्या पत्नी वीणा आनंद याही याच विधानसभा मतदारसंघातून आमदार होत्या. दिल्ली सरकारचे माजी मंत्री राजेंद्रपाल गौतम यांच्या जागी राजकुमार आनंद मंत्रिमंडळात सामील झाले होते. आनंद यांची सध्या मनी लाँडरिंगप्रकरणी चौकशी सुरू आहे. त्या अनुषंगानेच ही छापेमारी 'ईडी'ने केली.

SCROLL FOR NEXT