ED Raids Satish Jarkiholi pudhari
राष्ट्रीय

ED Raids Satish Jarkiholi: कर्नाटकचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या ठिकाणांवर EDचा छापा; महराष्ट्रासह १८ ठिकाणी एकाचवेळी कारवाई

Anirudha Sankpal

ED Raids Satish Jarkiholi: कर्नाटकचे PWD मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या ठिकाणांवर EDचा छापेमारी झाली आहे. बंगळुरू, बेळगावसह महाराष्ट्रातील जवळपास १८ ठिकाणी एकाचवेळी छापे पडले आहेत. सतीश जारकीहोळी यांच्या डॉलर्स कॉलनीतील निवासस्थानीही EDची कारवाई झाली असून कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे.

काँग्रेस खासदार आणि त्यांची कन्या प्रियंका जारकीहोळी यांच्याशी संबंधित ठिकाणांचाही ED कडून कसून तपास सुरू आहे. २४ जूनला जारकीहोळी यांचे मेहुणे मंजुनाथ यांच्या घरावरही ED ने छापा टाकला होता. परदेशात बेकायदेशीररीत्या पैसा पाठवल्याच्या प्रकरणाशी तपासाचा संबंध असल्याच समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT