पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमध्ये अंमलबजावणी संचालनालयाची (ED) मोठी कारवाई सुरू आहे. कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात ईडीने छत्तीसगडमधील १४ ठिकाणी छापे टाकले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्या मुलाच्या निवासस्थानी ही ईडीने धाड टाकली आहे.
दरम्यान, भूपेश बघेल यांच्या कार्यालयाकडून या कारवाईवर टिपणी करण्यात आली आहे. सात वर्षांपासून सुरू असलेला खोटा खटला न्यायालयात फेटाळण्यात आला असताना, आज सकाळी ईडीचे पाहुणे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस सरचिटणीस भूपेश बघेल यांच्या भिलाई येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत. जर कोणी या कटाद्वारे पंजाबमध्ये काँग्रेसला रोखण्याचा प्रयत्न करत असेल तर तो गैरसमज आहे.
-