‘ट्रानएक्सॅमिक सिड’, ‘मेटोक्लोप्रॅमाईड’ औषधांसाठी ड्रग्ज सेप्टी अलर्ट जारी  Pudhari File Photo
राष्ट्रीय

Drug Safety Alert | ‘ट्रानएक्सॅमिक सिड’, ‘मेटोक्लोप्रॅमाईड’ औषधांसाठी ड्रग्ज सेप्टी अलर्ट जारी

,, , , , , ,

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारताच्या औषध नियामक प्राधिकरणाने सामान्यतः वापरल्या जाणार्‍या दोन औषधांबाबत नवीन धोक्याची सूचना जारी केली आहे. डॉक्टरांना आणि रुग्णांना संभाव्य गंभीर दुष्परिणामांवर लक्ष ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या भारतीय फार्माकोपिया कमिशनने ‘ट्रानएक्सॅमिक सिड’ आणि ‘मेटोक्लोप्रॅमाईड’ या दोन औषधांसाठी सुरक्षा सूचना जारी केल्या आहेत. ही सूचना ‘फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया’च्या अंतर्गत ऑगस्टमध्ये गोळा केलेल्या औषधांच्या दुष्परिणामांच्या आधारावर देण्यात आली आहे.

जास्त रक्तस्राव रोखण्यासाठी हे औषध वापरले जाते. जसे की, मासिक पाळीत जास्त रक्तस्राव, नाकातून रक्त येणे किंवा शस्त्रक्रियेनंतर होणारा रक्तस्राव. या औषधामुळे नाकात सूज येणे हा दुष्परिणाम दिसून आला आहे. ही समस्या सामान्यतः गंभीर नसली, तरी यामुळे खूप अस्वस्थता जाणवू शकते आणि काहीवेळा हे अधिक गंभीर अंतर्निहित समस्येचे संकेत असू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT