भाजपच्या संघटनात्मक निवडीसाठी डॉ. के. लक्ष्मण राष्ट्रीय निवडणूक अधिकारी Pudhari Photo
राष्ट्रीय

भाजपच्या संघटनात्मक निवडीसाठी डॉ. के. लक्ष्मण राष्ट्रीय निवडणूक अधिकारी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवाः भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि एकुणच संघटनात्मक निवडीसाठी राष्ट्रीय निवडणूक अधिकारी आणि सह निवडणूक अधिकारी जाहीर केले आहेत. राष्ट्रीय निवडणूक अधिकारी म्हणून खासदार डॉ. के. लक्ष्मण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सह निवडणूक अधिकारी म्हणून खासदार नरेश बंसल, पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा रेखा वर्मा, खासदार संबित पात्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लवकरच भाजपाला मिळणार नवे अध्यक्ष

भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपला आहे. देशातील लोकसभा निवडणूक आणि विविध राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा कार्यकाळ काही महिने वाढवण्यात आला होता. मात्र यानंतर लवकरच भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष निवडले जाणार आहेत. तत्पूर्वी विविध राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका होतील, त्यानंतर अध्यक्षपदाची निवड होईल, यासाठी भाजपने निवडणूक अधिकारी जाहीर केले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT