डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तत्वे स्वावलंबी भारताला चालना देतील : पंतप्रधान मोदी  file photo
राष्ट्रीय

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तत्वे स्वावलंबी भारताला चालना देतील : पंतप्रधान मोदी

Ambedkar Jayanti 2025 | Narendra Modi | जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना PM मोदींनी केले अभिवादन

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेमुळेच आज देश सामाजिक न्यायाचे स्वप्न साकार करण्यासाठी समर्पित वृत्तीने कार्यरत आहे. त्यांची तत्वे आदर्श, स्वावलंबी आणि विकसित भारताच्या निर्मितीला बळ आणि गती देतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी संसद भवन संकुलातील त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, डॉ. आंबेडकरांची तत्वे आणि विचार स्वावलंबी आणि विकसित भारताच्या निर्मितीला गती देतील. त्यांच्या प्रेरणेमुळेच देश सामाजिक न्यायाचे स्वप्न साकार करण्यासाठी समर्पित आहे.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT