लिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू. File Photo
राष्ट्रीय

खलिस्‍तानी दहशतवादी पन्नूने दिली विमान उडवून देण्याची धमकी

आंतरराष्‍ट्रीय प्रवाशांना म्‍हणतो, १ ते १९ नोव्‍हेंबर 'एअर इंडिया'तून प्रवास करु नका

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू ( Khalistani terrorist Pannun) याने पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. शीख दंगलीला ४० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आम्‍ही एअर इंडियाच्या विमानांवर हल्ला करु, आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी १ ते १९ नोव्‍हेंबर एअर इंडियातून प्रवास करु नये, असे त्‍याने म्‍हटले आहे.

शीख फॉर जस्टिस या संघटनेची स्थापना करणारा पन्नू हा नेहमी भारताविरोधा गरळ ओकत असोत. खलिस्तानच्या नावाखाली लोकांना भडकावल्यामुळे भारताने पन्नूला दहशतवादी घोषित केले आहे. त्याच्यावर फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्याचा आणि पंजाबी शीख तरुणांना शस्त्रे घेण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. पन्‍नू याला केंद्र सरकारने 2020 मध्ये, बेकायदेशीर कृत्‍य प्रतिबंध कायदा (UAPA) अंतर्गत दहशतवादी घोषित केले आहे. तसेच त्‍याच्‍या शीख फॉर जस्टिस वरही बंदी घालण्यात आली आहे. या संघटनेच्‍या यूट्यूब चॅनेलवरही बंदी घालण्यात आली आहे. पन्नू फरार असून तिने अमेरिकेत आश्रय घेतला असल्‍याचा संशय आहे. त्‍याच्‍याकडे कॅनडाचेही नागरिकत्वही आहे.

गुरपतवंत सिंग पन्नू याने एप्रिल 2023 मध्ये त्यांनी एका व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना आसाम भेटीदरम्यान धमकी दिली होती. जून 2023 मध्ये, दोन महिन्यांत इतर तीन प्रमुख खलिस्तानी नेत्यांच्या मृत्यूनंतर पन्नू अज्ञातवासात आहे. 2001 मध्ये संसदेवर दहशवादी हल्‍ला झाला होता. याच दिवशी किंवा त्‍यापूर्वी संसदेवर हल्‍ला करण्‍याची धमकीही त्‍याने डिसेंबर २०२३मध्‍ये दिली होती. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी त्‍याने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि राज्याचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनाही त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT