Trump Tariff News  
राष्ट्रीय

Donald Trump | ट्रम्‍प यांच्या जेनेरिक औषधांवरील 100 टक्‍के टॅरिफ लावण्याच्या योजनेला तात्‍पुरता ब्रेक!

भारतातील अनेक औषध उत्‍पादकांना दिलासा : निर्णयामुळे अनेक कंपन्याचे शेअर वधारले

Namdev Gharal

नवी दिल्‍ली : भारतीय औषध कंपन्यांसाठी चांगली बातमी आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनान्ड ट्रम्‍प यांनी जेनेरिक औषधांवर १०० टॅरिफ लावणाऱ्या योजनेची अंमलबजावणी लांबवली आहे. यामुळे भारतीय औषध कंपन्यांबरोबरच अमेरिकेत स्‍वस्‍त औषधांवर अवलंबून असणाऱ्या अनेक नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

सप्टेंबर 2025 च्या शेवटी ट्रम्प यांनी घोषणा केली की अमेरिकेत आयात होणाऱ्या “ब्रँडेड किंवा पेटंट असलेल्या” औषधांवर १००% टॅरिफ लावले जाईल असे जाहीर केले होते. पण यामुळे भारतातील अनेक औषध उत्‍पादक कंपन्यांना फटका बसणार होता. पण आता व्हाईट हाऊसने जनेरिक औषधांच्या आयातीवर कर लादण्याची योजना स्‍थगित केली आहे.

अमेरिकेतील औषधपुरवठा करणाऱ्या अनेक जनेरिक कंपन्यांना हा दिलासा ठरणार आहे. ब्‍लडप्रेशर तसेच कोलेस्‍ट्रॉलवरील आजारांवर उपयोगात येणारी अनेक औषधे ही या कंपन्या तयार करतात. ही औषधे नियमित घेणाऱ्या रुग्‍णांनाही याचा फायदा होणार आहे.

अमेरिकेज इतर देशांपेक्षा भारतातून मोठ्या प्रमाणात जनेरिक औषधे निर्यात केली जातात. पण आता प्रिस्‍क्राईब औषधांसह इतर औषधांवर शुल्‍क वाढ करण्याच्या निर्णयावर गेले महिनाभर चर्चा सुरु होती. अनेकांनी यावर टिकाही केली होती पण आता परदेशातून आयात होणाऱ्या जेनेरिक औषधांवर शुल्‍क लावण्याची सध्या काही योजना नाही असे अमेरिकी प्रशासनाने म्‍हटले आहे.

फार्मास्युटिकलमधील काही कंपन्यांना या टॅरिफपासून सूट देण्याची तयारी सुरू आहे. काही अहवाल असे सांगतात की ट्रम्प यांनी टॅरिफ प्रत्यक्षात लावण्याची योजना आता थांबवली आहे, म्हणजे लगेच अमलात येणार नाही.

औषध कंपन्यांचे शेअर्स वधारले

अमेरिकन प्रशासनाने हा निर्णय घेतल्‍यानंतर अरबिंदो फार्मा, ल्‍युपिन, डॉ. रेड्डीज लॅब्‍ज, झायडस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये २ ते ४ टक्‍क्‍यापर्यंत वाढ दिसून आली. या कपन्यांची मोठ्या प्रमाणात औषधे अमेरिकेमध्ये निर्यात होतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT