Viral Dog Video file photo
राष्ट्रीय

Viral Dog Video: माणुसकी हरली! मृत्यूला चकवून ७ श्वानांनी १७ किमी पार करत गाठलं आपलं गाव; डोळ्यात पाणी आणणारा व्हिडिओ

एकीकडे मानवी क्रूरतेच्या गोष्टी कानावर येत असतानाच, चीनमधून माणुसकीला आणि प्राण्यांच्या इमानाला सलाम करायला लावणारा भावूक व्हिडिओ समोर आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

viral dog video China

बीजिंग: एकीकडे मानवी क्रूरतेच्या गोष्टी कानावर येत असतानाच, चीनमधून माणुसकीला आणि प्राण्यांच्या इमानाला सलाम करायला लावणारा भावूक व्हिडिओ समोर आला आहे. कुत्र्यांचे मांस विकणाऱ्या व्यापाऱ्याच्या तावडीतून सुटलेले एका गावातील ७ श्वान चक्क १७ किलोमीटरचा प्रवास करून सुखरूप आपल्या मालकांपर्यंत पोहचले. एखाद्या शिस्तबद्ध सैनिकांप्रमाणे एकमेकांना सावरत घराकडे निघालेल्या या श्वानांच्या जिद्दीचा व्हिडिओ नेटकऱ्यांची मने जिंकत आहे.

ईशान्य चीनमधील जिलिन प्रांतातील चांगचून येथील महामार्गावर लु नावाच्या एका व्यक्तीला हे सात श्वान एकत्र चालताना दिसले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हे श्वान एखाद्या सैनिकांप्रमाणे शिस्तबद्ध रांगेत चालत होते. यामध्ये एक 'कॉर्गी' जातीचा श्वान सर्वांचे नेतृत्व करत होता, तो वारंवार मागे वळून आपले सोबती येत आहेत की नाही, याची खात्री करत होता. या गटात एक जखमी 'जर्मन शेफर्ड' देखील होता, ज्याला इतर श्वान संरक्षण देत चालत होते.

या घटनेचा व्हिडिओ करणाऱ्या लु यांनी सांगितले की, "हे श्वान भटक्या कुत्र्यांसारखे अजिबात वाटत नव्हते. संकटात सापडलेल्या भावांप्रमाणे ते एकमेकांच्या सोबतीने पुढे सरकत होते." लु यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र घाबरलेले सर्व श्वान कोणालाही जवळ येऊ देत नव्हते.

ड्रोनच्या मदतीने शोध आणि बचाव

लु यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताच स्थानिक प्रशासन आणि 'बिटर कॉफी स्ट्रे डॉग बेस' या प्राणीप्रेमी संस्थेचे स्वयंसेवक तातडीने मदतीला धावले. त्यांनी ड्रोनच्या मदतीने त्यांचा मागोवा घेतला. तपासात असे समोर आले की, हे सर्व श्वान एकाच गावातील असून त्यांना मांस विक्री करणाऱ्या टोळीने पळवून नेले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT