तमिळनाडूमध्ये थलपती विजय यांच्या सरकारमध्ये काँग्रेस सामील झाल्यानंतर, डीएमकेने (DMK) विरोधी पक्षांच्या ऐक्याला मोठा धक्का दिला आहे File Photo.
राष्ट्रीय

DMK skips INDIA alliance meeting | द्रमुकचा 'INDIA' आघाडीला मोठा झटका, दिल्लीतील बैठकीकडे फिरवली पाठ

काँग्रेसने केलेल्या विश्वासघातामुळे कार्यकर्ते प्रचंड दुखावल्याची पक्षाची भूमिका

पुढारी वृत्तसेवा

DMK skips INDIA alliance meeting

चेन्नई : तमिळनाडूमध्ये थलपती विजय यांच्या सरकारमध्ये काँग्रेस सामील झाल्यानंतर, डीएमकेने (DMK) विरोधी पक्षांच्या ऐक्याला मोठा धक्का दिला आहे. ८ जून रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या 'INDIA' आघाडीच्या बैठकीपासून डीएमकेने अंतर राखले आहे. निवडणूक निकालानंतर काँग्रेसने डीएमकेसोबत जो विश्वासघात केला, त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते अजूनही प्रचंड दुखावलेले आहेत, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे.

द्रमुकची साथ सोडत काँग्रेस 'टीव्‍हीके'बरोबर सत्तेमध्‍ये

गेल्या महिन्यात जाहीर झालेल्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालात विजय यांच्या 'टीव्हीके' (TVK) पक्षाने चमकदार कामगिरी करत १०८ जागा जिंकल्या, ज्यामुळे डीएमकेला आपली सत्ता गमवावी लागली. यानंतर काँग्रेसने सर्वात आधी टीव्हीकेला पाठिंबा देण्याची घोषणा केली. त्यानंतर डाव्या पक्षांसह इतर छोट्या पक्षांनी आणि एआयएडीएमकेच्या (AIADMK) आमदारांनीही विजय यांच्या बाजूने मतदान केले.

काँग्रेस हा दीर्घकाळापासून डीएमकेचा मित्रपक्ष

काँग्रेस हा दीर्घकाळापासून डीएमकेचा मित्रपक्ष राहिला आहे, अगदी राहुल गांधी डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन यांना आपला भाऊ मानत असत. तमिळनाडूची निवडणूकही काँग्रेस आणि डीएमकेने एकत्र मिळून लढवली होती, मात्र निकालानंतर काँग्रेसने टीव्हीकेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्‍याने द्रमुकला मोठा धक्‍का मानला गेला.

डीएमकेने पत्रकात काय म्हटले?

डीएमकेने जारी केलेल्या अधिकृत पत्रकात म्हटले आहे की: "तमिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाने डीएमकेसोबत केलेल्या विश्वासघातामुळे डीएमके कार्यकर्ते अद्यापही अत्यंत दुखावलेले आहेत. कार्यकर्त्यांच्या याच भावना लक्षात घेऊन, पक्ष ८ जून रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या 'INDIA' आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार नाही. विशेषतः अशा बैठकीत, जिथे काँग्रेस पक्षही उपस्थित राहणार आहे. डीएमके या बैठकीला जाणार नसली, तरी देशाच्या कल्याणाशी जोडलेल्या आणि बैठकीतील इतर पक्षांकडून मांडल्या जाणाऱ्या मुद्द्यांवर नेहमीप्रमाणे आपला आवाज उठवत राहील."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT