Central government employees file photo
राष्ट्रीय

DA Hike: सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी Good News! दिवाळीपूर्वी महागाई भत्त्यात ३ टक्के होणार वाढ!

Central government employees: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी दिवाळीपूर्वी एक मोठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.

मोहन कारंडे

DA Hike Central government employees

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी दिवाळीपूर्वी एक मोठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ लवकरच महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी देण्याची शक्यता आहे.

दिवाळीचा सण तोंडावर असताना, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीची उत्सुकता लागली होती. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, आजच्या नियोजित मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय होऊ शकतो. सरकारकडून दरवर्षी जानेवारी आणि जुलै मध्ये महागाई भत्ता (Dearness Allowance) आणि महागाई सवलत (Dearness Relief) मध्ये द्वैवार्षिक सुधारणा केली जाते, जेणेकरून कर्मचारी आणि निवृत्त लोकांना महागाईच्या वाढत्या दरापासून संरक्षण मिळू शकेल. यावर्षी सप्टेंबरच्या अखेरीस घोषणा आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीस थकबाकी देण्याची प्रथा असताना, अधिसूचनेत थोडा विलंब झाला होता. या विलंबाबद्दल कॉन्फेडरेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अँड वर्कर्स (CCGEW) ने चिंता व्यक्त केली होती.

कर्मचारी-पेन्शनधारकांना नेमका किती फायदा?

७व्या वेतन आयोगांतर्गत ज्या कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन १८,००० रुपये आहे, त्यांच्या मासिक कमाईत ५४० रुपयांची वाढ होईल. यामुळे त्यांचे एकूण वेतन २८,४४० रुपयांपर्यंत पोहोचेल. तर किमान ९,००० रुपये पेन्शन असलेल्या सेवानिवृत्तांसाठी ही वाढ २७० रुपये असेल. या ३ टक्के वाढीनंतर महागाई दिलासा दर (DR) ५८ टक्के होईल आणि त्यांची एकूण पेन्शन १४,२२० रुपयांपर्यंत वाढेल. केंद्रीय मंत्रिमंडळाने यापूर्वीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी कामगिरीवर आधारित बोनसला मंजुरी दिली आहे. आता DA/DR वाढीच्या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दिवाळीच्या उत्साहात आणखी भर पडणार आहे.

मागील महागाई भत्ता वाढ

या वर्षीच्या सुरुवातीला, सरकारने मार्चमध्ये महागाई भत्त्यात २ टक्के वाढ करण्यास मान्यता दिली होती, जी मूळ पगार आणि पेन्शनच्या ५३ वरून ५५ टक्क्यांपर्यंत वाढवली होती. नवीन वाढ मंजूर झाल्यानंतर, या आकड्यात भर पडेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT