राष्ट्रीय

राज्यपालांना हेलिकॉप्टर मिळेना; ममता बॅनर्जीवर धनकड नाराज 

Pudhari News

पुढारी ऑनलाईन डेस्क

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विमानातून उतरल्यानंतर भाजप आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. आता त्याची पुनरावृत्ती पश्चिम बंगालमध्ये होत आहे. राज्यपाल जगदीप धनकड यांना कारणे सांगून हेलिकॉप्टर नाकारले जात आहे. त्यामुळे राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वाचा : पुणे : राजीव सातव यांची प्रकृती खालावली

ममता बॅनजी यांच्या मंत्रिमंडळाचा सोमवारी विस्तार झाला. या शपथग्रहन समारंभात धनकड व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे सहभागी झाले. यावेळी  धनकड यांनी पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचाराचा उल्लेख केला. बंगालमध्ये संविधानाच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत. राज्यात संविधानिक सर्वोच्च पदावर बसलेल्यांचा सन्मान ठेवला जात आहे. त्यांना किरकोळ समजले जाते, अशी नाराजी व्यक्त केली. 

ममता बॅनर्जी यांच्या शपथविधी समारंभावेळीही धनकड यांनी हिंसचाराचा उल्लेख करून राज्य सरकारला जबाबदार ठरविले होते. मात्र, ममता बॅनर्जी यांनी हिंसाचाराच्या घटना घडल्या त्यावेळी राज्यात निवडणूक आयोगाचे नियंत्रण होते. त्यामुळे आयोगाला जबाबदार ठरविले पाहिजे, असे प्रत्युत्तर दिले. मंत्रिमंडळ विस्तारानंतर धनकड यांनी उपस्थित केलेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया देताना 'राज्यात शांतता असून कुठेच हिंसा होत नाही' असे प्रत्युत्तर दिले. 

वाचा : कोल्हापुरात आज मध्यरात्रीपासून एकदम कडक लॉकडाऊन; काय चालू आणि काय बंद राहणार?

जगदीप धनकड म्हणाले, 'मला राज्यातील असंवेदनशील परिसरांचा दौरा करायचा आहे. मी हेलिकॉप्टर मागत आहे, पण मला ते दिले जात नाह. कधी स्पष्ट नकार दिला जातो तर कधी अनौपचारिकरित्या हेलिकॉप्टर नसल्याचे तर कधी पायलट नसल्याचे सांगितले जाते.' 

ते म्हणाले, 'पश्चिम बंगाल मध्ये लोकशाहीच्या नावाखाली कपडे फाडले जात आहेत. मला जेव्हा याची माहिती मिळते तेव्हा दु:ख होते. २ मे रोजी जी घटना घडली त्याचा ३ मे रोजी मी डीजीपींकडून अहवाल मागितला. अतिरिक्त मुख्य सचिवांकडून उत्तर मागितले. मात्र, त्यांच्याकडून काहीच उत्तर नाही. 

पोलिस कमिशनर, डीजीपींचे उत्तर आले नाही म्हणून मी मुख्य सचिवांना बोलावून घेतले. ते पोलिस कमिशनरना घेऊन आले. मात्र अहवाल आला नव्हता. त्यांनीही मला काही माहिती दिली नाही. मी कारण विचारले तरीही त्यांनी काहीच सांगितले नाही. 

वाचा : पीएम मोदींना पत्र जाताच गोपीचंद पडळकरांचा मुख्यमंत्र्यांना सवाल 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT