राष्ट्रीय

भाजप विरुद्ध काँग्रेस; तीन राज्यांत सरळ लढत

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांमध्ये केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस यांच्यात थेट सामना रंगणार आहे.

मध्य प्रदेशात भाजप, तर छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेस सत्तेत आहे… तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती हा पक्ष सत्तेत असून काँग्रेस आणि भाजपने जोरदार कंबर कसल्याने तिथेतिरंगी लढत होईल. ईशान्येकडील मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट विरुद्ध कॉंग्रेस असा संघर्ष असेल. मिझो नॅशनल फ्रंट हा भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष आहे.

६७९ मतदारसंघ, १६.१ कोटी मतदार

मध्य प्रदेशात २३०, छत्तीसगडमध्ये ९०, राजस्थानात २००, तेलंगणात ११९ आणि मिझोराममध्ये ४० अशा एकूण ६७९ विधानसभा मतदारसंघांसाठी १६. १ कोटी मतदार मतदान करतील. त्यात पुरुष मतदार ८ कोटी, तर ७ कोटी महिला मतदार आहेत. या निवडणुकांमध्ये ६० लाख तरुण मतदार पहिल्यांदा मतदान करतील.

मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी पाच राज्यांमध्ये १.७७ लाख मतदान केंद्रे असतील. सर्व मतदान केंद्रांमध्ये पेयजल, दिव्यांगांसाठी मदत आदी सुविधा उपलब्ध असतील. यंदा महिला मतदारांची संख्या वाढल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.

जम्मू-काश्मीरमध्ये पूर्ण विचारानंतरच निवडणुका

जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका कधी होणार या प्रश्नावर त्यांनी सुरक्षा आणि अन्य गोष्टींची दखल घेऊन योग्यवेळी निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT