राष्ट्रीय

बाईकवर बसून केले पॅराग्लायडिंग

Arun Patil

सिमला, वृत्तसंस्था : हिमाचल प्रदेशात एकाने इलेक्ट्रिक बाईकवरून पॅराग्लायडिंग केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या आश्चर्यकारक व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यांनी ते थरारक दृश्य मोबाईलमध्ये टिपून घेतले.

पॅराग्लायडरचे एकूण वजन कमी आणि उड्डाण करताना कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये, म्हणून इलेक्ट्रिक बाईकमधून बॅटरी काढण्यात आली होती. हा अनोखा व्हिडीओ हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ बंदलाधार येथील आहे. हर्ष नावाच्या पायलटने हा थरारक स्टंट केला आहे. पहिल्यांदाच बाईकवरून यशस्वी पॅराग्लायडिंग केल्याचा मोठा आनंद असल्याचे हर्ष याने सांगितले. हर्ष हा पंजाबमधील एक प्रशिक्षित पॅराग्लायडर आहे. बंदलाधार जगभरातील तीन प्रमुख पॅराग्लायडिंग ठिकाणांपैकी एक आहे.

SCROLL FOR NEXT