Dharmpal Singh UP minister Pudhari
राष्ट्रीय

Dharmpal Singh: कचऱ्यापासून सोनं तयार करणार, मशिनचं काम अंतिम टप्प्यात; भाजप मंत्र्यांचा दावा; Video Viral

Dharmpal Singh: उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रीमंडळातील सदस्य

Akshay Nirmale

Dharmpal Singh statement on garbage and gold goes viral

लखनौ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रीमंडळातील एका मंत्र्याचे वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. या मंत्र्याने चक्क कचऱ्यापासून सोने निर्मिती करण्याचा दावा केला आहे. त्यासाठीचे मशिनही बनवले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

धरमपाल सिंग असे या मंत्र्याचे नाव आहे. ते भाजपचे आंवला येथील आमदार असून उत्तरप्रदेश सरकारमधील पाटबंधारे खात्याचे मंत्री आहेत. त्यांचे वक्तव्य सोशल मीडियात व्हायरल झाले आहे.

काय म्हणाले धरमपाल सिंग?

धरमपाल सिंग म्हणाले की, उत्तरप्रदेशमध्ये कचऱ्यापासून सोने बनवले जाईल. त्यासाठी लवकरच मशिनही तयार केले जात आहे. सध्या मशिन निर्मितीत थोड्या अडचणी येत आहेत. पण मशिन बनल्यानंतर मेरठमध्ये कचऱ्यापासून सोने बनवले जाईल.

दरम्यान, धरमपाल सिंग हे मेरठचे प्रभारी असून गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. नगरपालिकेच्या स्वच्छता कामांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना हे वक्तव्य केले.

कचऱ्याचे वर्गीकरण करण्याच्या सूचना

ते म्हणाले, नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कचरा व्यवस्थापनाबाबत सूचना दिल्या आहेत. नागरीक बऱ्याचदा नाल्यांमध्ये कचरा टाकतात. विविध प्रकारचा कचरा थेट नाल्यांमध्ये टाकला जातो. हा कचरा नाल्यामधून बाहेर काढन या कचऱ्याचे वर्गीकरण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यामुळे नालेही स्वच्छ राहतील आणि कचऱ्याचेही वर्गीकरण होईल.

नाल्यांमधील कचरा काढून काठावर ठेवला जातो. तो परत नाल्यांमध्ये जातो. त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. मेरठमध्ये कचऱ्यापासून सोने बनविण्यासाठी मशिन लवकरच बनवून तयार होईल. त्यानंतर मेरठमध्ये कचऱ्यापासून सोने बनवले जाईल.

चाय पे चर्चा

धरमपाल सिंग यांनी सुरवातीला सोमवारी विकासभवन येथे आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी शहरातील विविध ठिकाणी लोकांसोबत चहा घेत चर्चा केली. सर्वसामान्य लोकांशी त्यांनी प्रश्नोत्तरांच्या संवादातून चर्चा केली. समस्या निवारण आणि लोकांशी नाते जोडणे यासाठी चाय पे चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT