Tirupati Tirumala news Pudhari
राष्ट्रीय

Tirupati Tirumala news | तिरुपती येथे भाविकांना दररोज दोन वेळा मोफत मिळणार 'हा' खास पदार्थ

Tirupati Tirumala news | तिरुमला तिरुपती देवस्थानमचा नवा उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

Tirumala Tirupati Devasthanams to give vada to devotees twice a day

तिरुपती: आंध्रप्रदेशातील सुप्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थानम (Tirumala Tirupati Devasthanams - TTD) हे अतिशय प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थानतर्फे विविध मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

आता देवस्थानम (TTD) ने भाविकांसाठी एक आनंददायक घोषणा केली आहे. दररोज दोन वेळा मोफत वड्यांचा आस्वाद भाविकांना घेता येणार आहे. प्रसिद्ध अन्नप्रसाद सेवा केंद्र मातृश्री तारिगोंडा वेंगमांबा अन्नप्रसाद केंद्र येथे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

TTD विद्यमान अध्यक्ष बी. आर. नायडू यांच्या हस्ते पारंपरिक विधी करून या विस्तारित सेवेला अधिकृत सुरुवात करण्यात आली. त्यांनी स्वतः उपस्थित राहून भक्तांना गरमागरम वडा वाटप करत भक्तीभाव आणि सेवाभाव व्यक्त केला.

दररोज 75000 वडे तयार करणार

पूर्वी वडे केवळ दुपारच्या भोजनात दिले जात होते. दररोज सुमारे 40000 वड्यांची व्यवस्था होती. मात्र भाविकांच्या मागणीनंतर आता सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 10.30 वाजेपर्यंत, दिवसातून दोन वेळा — दुपारी व रात्री वडा दिला जाणार आहे. या निर्णयामुळे TTD दररोज 70 ते 75000 वडे तयार करणार असल्याचे नायडूंनी स्पष्ट केले.

विशेष मसाल्याचा वापर

TTD तर्फे बनवले जाणारे वडे हे त्यांच्या खास चवीसाठी प्रसिद्ध आहेत. हे वडे बनवण्यासाठी चणाडाळ, हिरव्या मिरच्या, आले, कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना आणि बडीशेप वापरली जाते. त्यामुळेच यांची चव भाविकांच्या पसंतीस उतरते.

अन्नदान परंपरेला 40 वर्षे

ही अन्नप्रसाद सेवा 1985 मध्ये श्री वेंकटेश्वर नित्य अन्नदान योजना अंतर्गत सुरू झाली होती. या योजनेंतर्गत दररोज हजारो भाविकांना मोफत, सात्त्विक व स्वच्छ अन्न दिले जाते. वडा सेवा वाढवण्याचा निर्णय हीच परंपरा अधिक बळकट करतो.

दरम्यान, या निर्णयाचे भाविकांकडून भरभरून स्वागत होत आहे. अन्नप्रसादात स्वादिष्ट वड्यांची वाढलेली उपलब्धता ही तिरुपतीच्या यात्रेला अधिक समाधानकारक बनवत आहे.

देवस्थानतर्फे दिल्या जाणाऱ्या इतर सुविधा

तिरुमला तिरुपती देवस्थानतर्फे भाविकांसाठी दिल्या जाणाऱ्या इतर सुविधा-

  • मोफत अन्नदान- येथील अन्नप्रसादम हॉलमध्ये भाविकांना मोफत अन्न दिले जाते. सकाळीपासून रात्रीपर्यंत दररोज हजारो भाविक याचा लाभ घेतात. यात इडली, पोंगल, सांबार, भात, पुलिहोरा असे पदार्थ दिले जातात.

  • मोफत लाडू प्रसाद- सर्व भाविकांना दर्शनानंतर मोफत लाडू प्रसाद दिला जातो. अतिरिक्त लाडू कमी किमतीत विकले जातात.

  • मोफत निवास- देवस्थान समिती काही विश्रांतीगृहांमध्ये (जसे कि Vishnu Nivasam, Srinivasam Complex इत्यादी) भाविकांना काही मर्यादित खोल्या मोफत देतात. तसेच, मोठ्या विश्रांतीगृहांमध्ये कमी दरात खोल्या मिळू शकतात. चंद्रगिरी आणि चतुर्वेदी मंडपात सामूहिक निवासाची (Dormitory) सुविधा देखील आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT