राम रहिम File Photo
राष्ट्रीय

असाही राजकीय 'योगायोग', गुरमीत राम रहिमला आणखी ३० दिवसांचा पॅरोल!

सुनारिया तुरुंगातून नवव्यांदा पॅरोलवर सुटका, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या आरोपाखाली सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत असलेला स्‍वयंघाेषित अध्‍यात्‍मिक गुरु, डेरा सच्‍चा साैदा प्रमुख गुरमीत राम रहिम ( Dera chief Ram Rahim) याची पुन्‍हा एकदा पॅरोलवर सुटका झाली आहे. त्‍याची ३० दिवसांचा पॅरोलवर तुरुंगातून सुटका झाली आहे. लैंगिक अत्याचार आणि हत्‍या प्रकरणी २०१७ मध्‍ये त्‍याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तेव्‍हापासून त्‍याची नवव्‍यांदा पॅरोलवर सुटला झाली आहे. राम रहिमला मिळणार पॅरोल आणि निवडणुका या समीकरणाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

२०१७ मध्‍ये सुनावण्‍यात आली होती जन्‍मठेपेची शिक्षा

२०१७ मध्ये गुरुमीत राम रहीमला लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या आरोपाखाली दोषी ठरवल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तेव्हापासून तो रोहतकमधील सुनारिया तुरुंगात आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी, राम रहीमला उत्तर प्रदेशातील बागपत येथील त्याच्या आश्रमात राहण्यासाठी २० दिवसांची पॅरोल मंजूर करण्‍यात आला होता.

पॅरोल म्‍हणजे काय ?

कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना विविध कारणांसाठी संचित (हक्काची) आणि पॅरोल (अभिवचन) रजा मंजूर करण्यात येते. दोषसिद्ध आरोपीला वैद्यकीय कारणास्तव किंवा कुटुंबावर सदस्‍याचे निधन झाले तर पॅरोल मंजूर केला जातो. विशेष म्‍हणजे दिल्‍ली विधानसभा निवडणुकीतील मतदानाला अवघे काही दिवसांचा कालावधी असताना राम रहीमला ३० दिवसांचा पॅरोल मिळाला आहे.

नवव्यांदा पॅरोलवर सुटका

आज (दि.२८) सकाळी ६:३६ वाजता राम रहीम तुरुंगातून बाहेर पडला. राम रहीम रोहतक तुरुंगातून सिरसाला रवाना झाला आहे. यापूर्वीही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी राम रहीम पॅरोलवर बाहेर आला होता. हरियाणामध्ये नगरपालिका निवडणुका आहेत. यावेळी राम रहीम पॅरोल दरम्यान सिरसा येथे राहणार आहे.जन्‍मठेपेची शिक्षा सुनावल्‍यानंतर तो प्रथमच राम रहीम सिरसा येथील त्याच्या आश्रमात जात आहे. यापूर्वी राम रहीमला पॅरोल मिळाल्यावर तो यूपीतील बर्नवा आश्रमात जात असे.

निवडणुकीपूर्वी पॅरोल मंजूर, एक राजकीय 'योगायोग'

कोणत्‍याही महत्त्‍वपूर्ण निवडणुकीपूर्वी मागील चार वर्षात राम रहिमला पॅरोल मिळाला असल्‍याचे खालील तारखांवरुन स्‍पष्‍ट होते. २०१७ मध्‍ये राम रहिम याला जन्‍मठेपेची शिक्षा सुनावण्‍यात आली होती. यानंतर २० ऑक्‍टोबर २०२० मध्‍ये त्‍याला एक दिवसा पॅरोल मिळाला होता. विशेष म्‍हणजे नोव्‍हेंबर २०२० मध्‍ये बडोदा येथे पोटनिवडणूक झाली. फेब्रुवारी २०२२ मध्‍ये पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. या निवडणुकीपूर्वी त्‍याला २१ दिवसांचा पॅरोल मिळाला होता. तसेच राजस्थान विधानसभा निवडणूक २५ नोव्हेंबर २०२३ रोजी झाली. या निवडणुकीपूर्वीही त्‍याला २१ दिवसांचा पॅरोल मिळाला. लोकसभा निवडणुकीसाठी २५ मे २०२४ रोजी मतदान झाले. यापूर्वी १९ जानेवारी २०२४ रोजी राम रहिम याला ५० दिवसांचा पॅरोल मिळाला होता. मागील वर्षी १३ ऑगस्‍ट रोजी राम रहीमला २१ दिवसांची तुरुंगातून रजा मिळाली. यानंतर हरियाण विधानसभा निवडणुकीपूर्वी म्‍हणजे २ ऑक्टोबर २०२४ रोजी राम रहीमला २० दिवसांचा सशर्त आपत्कालीन पॅरोल मिळाला, तर राज्यात ५ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकासाठी मतदान झाले. आता हरियाणात नगर परिषद निवडणुका होणार आहेत. यापूर्वी त्‍याची ३० दिवसांचा पॅरोलवर तुरुंगातून सुटका झाली आहे. त्‍यामुळे राम रहिमला मिळणार पॅरोल आणि निवडणुका या समीकरणाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT