राष्ट्रीय

संविधान बदलविण्याच्या प्रयत्नाविरोधात विरोधकांची निदर्शने

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपकरून संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विरोधी इंडिया आघाडीच्या खासदारांनी सोमवारी सरकारवर हल्लाबोल केला. या खासदारांनी संविधानाच्या प्रती हातात घेऊन संसद परिसरात पंतप्रधानांविरोधात घोषणाबाजी केली.   

'इंडिया' आघाडीच्या खासदारांचा सहभाग

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांनी या निदर्शनात सहभाग घेतला. पंतप्रधान मोदी यांनी संविधान बदलविण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही निदर्शने करण्यात आल्याचे खर्गे यांनी सांगितले.  

SCROLL FOR NEXT